बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट ३१ मे २०१३ ला प्रदर्शित झाला. यानिमित्ताने या चित्रपटातील कलाकारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नुकतंच दीपिका पदुकोणने रणबीर कपूरबरोबरचे काही खास फोटो शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे

दीपिका पदुकोण ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने रणबीर कपूरबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

vidya balan smoking
“मला धूम्रपान करायला खूप आवडतं”, विद्या बालनचा खुलासा; म्हणाली, “‘द डर्टी पिक्चर’नंतर…”
will Salman Khan relocate from Galaxy apartment
गोळीबारामुळे सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? अरबाज खान म्हणाला, “नवीन ठिकाणी राहायला…”
suniel shetty and karisma kapoor dance on famous bollywood songs
Video : झांझरिया…२८ वर्षांनी सुनील शेट्टी-करिश्मा कपूरचा पुन्हा एकदा जबरदस्त डान्स, माधुरी दीक्षितने मारल्या शिट्ट्या
rekha kissed richa chadha baby bump video_cleanup
Video: रेखा यांनी गरोदर रिचाच्या पोटावर केलं किस, बाळाला दिले आशीर्वाद; नेटकरी जया बच्चन यांचा उल्लेख करत म्हणाले…

यावेळी करण जोहर, अयान मुखर्जी आणि मनीष मल्होत्रा ​​यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमही उपस्थित होती. त्यांच्या या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिकाने हे फोटो शेअर करत चित्रपटातील एक डायलॉग कॅप्शन म्हणून दिला आहे. “यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है; एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे-नैना तलवार” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

दीपिका पदुकोणने शेअर केलेल्या एका फोटोत ती रणबीरच्या खांद्यावर हात टाकून उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी ते दोघेही फारच खळखळून हसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “पिलू फक्त माझ्या मुलाची आई नव्हती”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, म्हणाले “दुसऱ्या लग्नाचा…”

दरम्यान ये जवानी है दिवानी या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. करण जोहर निर्मित हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट त्यांच्या मैत्री आणि नातेसंबंधांवर आधारित होता. या चित्रपटातील गाण्यांना विशेष पसंती मिळाली होती.