बॉलिवूडचे व्हिलन अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले. आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आशिष विद्यार्थी यांनी त्यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी रुपाली बरुआशी दुसरं लग्न केल्यामुळे त्यांचे कुटुंब दु:खी असल्याबद्दल सांगितले आहे. त्याबरोबरच त्यांना घरात कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबद्दलही सांगितले आहे.

आशिष विद्यार्थी यांनी २५ मे रोजी रुपाली बरुआबरोबर लग्न करत असल्याची माहिती दिली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलेल्या आशिष विद्यार्थींना अनेक प्रश्नही विचारण्यात आले. आशिष विद्यार्थींनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट का घेतला? त्यांची पहिली पत्नी कुठे आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांवर आशिषसह त्यांच्या पहिल्या पत्नीनेही खुलासा केला.
आणखी वाचा : “तुम्हाला आशीर्वाद…” आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट, म्हणाली “खूप खंबीर…”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

त्यानंतर आता आशिष विद्यार्थी यांनी ‘द टेलिग्राफ टी-२’ बरोबर संवाद साधला. यावेळी त्यांना दुसऱ्या लग्नामुळे त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होतात, याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, “पिलू आणि मी लग्नाच्या खास आठवणींबरोबर पुढे जात आहोत. मी पिलूला कधीही फक्त त्याच्या मुलाची आई मानले नाही. ती माझी मैत्रीण होती. ती माझी पत्नी होती. ती कायमच माझ्याबरोबर होती.”

“त्यामुळे आम्ही जेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्हाला त्रास झाला नाही, असं समजू नका. निरोप घेताना प्रत्येकाला वेदना होतात. ते खूप अवघड होते. पण पिलू, मी आणि मोगली (माझा मुलगा) आम्हा तिघांनाही याचा त्रास झाला. पण त्यावेळी आमच्याकडे एक पर्याय होता. तो म्हणजे तुम्हाला त्याचा सामना करायचा आहे की तुम्हाला त्याच्याबरोबर जगायचे आहे? यानंतर मात्र तुमचं आयुष्य पुढे जात असतं.” असे आशिष विद्यार्थी यांनी सांगितले.

“पिलूबरोबर घटस्फोट झाल्यानंतर मी रुपालीला माझ्या एका व्लॉगिंग असाइनमेंट दरम्यान भेटलो. त्यावेळी आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. तेव्हा मला कळले की रुपालीलाही तिच्या आयुष्यात खूप वेदना झाल्या आहेत. तिने पाच वर्षांपूर्वी तिचा पती गमावला होता आणि त्यानंतर पुन्हा लग्न करण्याचा कोणताही विचार तिने केला नव्हता. पण जेव्हा आम्ही बोललो, तेव्हा आम्हाला वाटले की, ती आयुष्याकडे एका नव्या दृष्टीने पाहू शकते आणि दुसऱ्या लग्नाचा विचारही करु शकते. त्यावेळी ती ५० वर्षांची होती आणि मी ५७ वर्षांचा, त्यामुळे का नाही? आपले वय, वंश किंवा दर्जा काहीही असो, आपल्यापैकी प्रत्येकजण आनंदी राहू शकतो. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी जबाबदारी पार पाडणे आणि त्यालाच मी प्राधान्य दिले आहे.” असे ते म्हणाले.

आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

आणखी वाचा : Video : “आमच्या नात्यात…” आशिष विद्यार्थींनी सांगितलं दुसरं लग्न करण्याचं खरं कारण, लव्हस्टोरीची माहिती देत म्हणाले “आम्ही एकमेकांना…”

दरम्यान आशिष विद्यार्थी यांची दुसरी पत्नी रुपाली बरुआ ही आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहे. ती फॅशन क्षेत्रात कार्यरत आहे. कोलकाता येथे तिचे बुटीक आणि कॅफे आहे. तर दुसरीकडे, आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी पीलू विद्यार्थी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि आरजे आहे. तिने ‘सुहानी सी एक लडकी’ आणि ‘इमली’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आशिष विद्यार्थी आणि पीलू यांना एक मुलगाही असून त्याचे नाव अर्थ असे आहे. तो टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपनीसाठी काम करतो.

Story img Loader