scorecardresearch

Video : “फक्त ब्रा आणि पेटीकोट…” दिशा पटानीचा साडीमधील हॉट लूक पाहून नेटकरी संतापले

प्रत्येक सेलिब्रिटीने अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये या सोहळ्याला हजेरी लावली

disha patani saree look
दिशा पटानीचा बोल्ड साडीमधील लूक व्हायरल (फोटो : सोशल मिडिया)

प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेन्टर गाला’चं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. अंबानींच्या या कल्चरल सेन्टरच्या या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूड स्टार्सनी या सोहळ्यात प्रचंड धमाल केली. या सोहळ्यातील बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहरुख खान, वरुण धवन, रणवीर सिंगपासून आलिया भट्ट, ऐश्वर्या राय, दीपिका पदूकोण रश्मिका मंदानापर्यंत कित्येकांनी या सोहळ्याला हजेरी लावून याची शान वाढवली. या सोहळ्याला प्रत्येकाने परिधान केलेल्या खास आऊटफिटची प्रचंड चर्चा होत होती. प्रत्येक सेलिब्रिटी अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये या सोहळ्यात आला आणि मीडियासमोर त्यांनी फोटोजही काढले.

आणखी वाचा : प्रसिद्ध रॅपर बादशाह दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; ‘या’ अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ

नेहमीप्रमाणेच या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी उठून दिसत होती. या सोहळ्यामध्ये दिशाने अत्यंत बोल्ड अशी रखाडी रंगाची झगमगती साडी परिधान करून हजेरी लावली. दिशा रेड कारपेटवर येताच सगळ्यांच्या नजरा दिशाच्या आऊटफिटकडेच वळल्या. अत्यंत बोल्ड आणि हॉट अशा अंदाजात दिशाने एंट्री घेतली. सध्या दिशाच्या या साडीतील लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिशाच्या चाहत्यांनी तिच्या या हॉट आणि बोल्ड लूकचे कौतुक केले आहे तर या साडीमुळे दिशा पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेली आहे. तिने ज्या पद्धतीने साडी नेसली आहे ते पाहता नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. एका युझरने कॉमेंट केली आहे की “जर सगळं दाखवायचंच आहे तर मग कपडे कशाला परिधान करता?” तर दुसऱ्या एका युझरने लिहिलं की “जर हिला साडी कशी नेसायची हेच माहीत नसेल तर हिने फक्त ब्रा आणि पेटीकोटच परिधान करावा.” दिशाचा हा लूक जबरदस्त व्हायरल होत असून तिच्या साडी नेसण्याच्या पद्धतीवर प्रचंड टीका होताना आपल्याला दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 14:11 IST

संबंधित बातम्या