अभिनेत्री करीना कपूर ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या लाईफस्टाईलमुळे ती खूप चर्चेत असते. ती पंजाबी कुटुंबात जन्माला आली असली तरीही तिचं मराठी पदार्थांवर खूप प्रेम आहे. काही महिन्यांपूर्वी तिने तिची डाएटिशन ऋजुता दिवेकर हिच्या घरी झुणका-भाकरी आणि खिचडीवर ताव मारला होता. तर आता करीन आणि वरण भाताला उद्देशून एक खास पोस्ट केली आहे.

करीनाला मराठमोळी पदार्थ खूप आवडतात. यापैकीच एक म्हणजे वरण-भात. सहसा अभिनेत्री भात खात नाहीत असा समज आहे पण करीना वरण-भात खूप आवडीने खाते. वरण-भात खाल्ल्याचे आरोग्यासाठीही खूप फायदे काही आणि हे करीनाला माहीत असल्यामुळे ती वरण-भात खाते.

आणखी वाचा : हटके फर्निचर ते प्रशस्त बेडरूम…’असे’ आहे करीना कपूरचे मुंबईतील घर, पहा Inside photos

आता तिने केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे. तिने तिचे दोन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोमध्ये तिची ग्लोईंग त्वचा दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “जर पोस्ट वरण भात लूक अशी काही गोष्ट असती तर तो असा दिसत असता.”

हेही वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीनाची ही पोस्ट आता खूप चर्चेत आली आहे. तर यावर कमेंट करत मराठमोळे लोक तिच्या या अंदाजाचं कौतुक करत आहेत.