Premium

Video: माधुरी दीक्षितने दिले मिसळ बनवण्याचे धडे, खास टिप्स शेअर करत म्हणाली…

माधुरीने बॉलीवूडमध्ये जरी काम केलं तरीही तिने तिचा मराठमोळा स्वभाव अजिबात बदललेला नाही. नुकतीच तिने तिचे पती श्रीराम नेने यांच्याबरोबर मिळून मिसळ बनवली आहे.

madhuri dixit made misal

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. माधुरीने बॉलीवूडमध्ये जरी काम केलं तरीही तिने तिचा मराठमोळा स्वभाव अजिबात बदललेला नाही आणि तिच्या याच गोष्टीचं अनेकदा कौतुक होत असतं. आता नुकतीच तिने तिचे पती श्रीराम नेने यांच्याबरोबर मिळून मिसळ बनवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधुरी दीक्षितचा चाहतावर्ग जगभर पसरलेला आहे. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. माधुरी देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करत असते. अनेकदा ते तिच्या पोस्टमधून मराठी संस्कृतीची झलक चाहत्यांना दाखवत असते. आता नुकताच तिने तिचा आणि श्रीराम नेने यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

माधुरी दीक्षितचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवर ती तिच्या पतीबरोबर विविध खाद्यपदार्थ बनवताना दिसते. तर आता नुकतीच त्यांनी महाराष्ट्राची खासियत असलेली मिसळ कशी बनवायची हे तिच्या तिच्या यूट्यूब चॅनलवरून चाहत्यांना दाखवलं. हे दाखवत असताना तिने श्रीराम नेने यांना मिसळ खूप आवडते असंही सांगितलं. मिसळीसाठी काय साहित्य लागतं, किती प्रमाणात काय वापरायचं हे तर तिने सांगितलं पण याचबरोबर ती कशी खायची आणि त्यात किती कॅलरीज असतात हे सांगत खास टिप्सही शेअर केल्या. या व्हिडीओचा एक ट्रेलर तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत त्यात ती म्हणाली, “आज आपण मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेली मिसळ बनवत आहोत. आम्हाला जॉईन व्हा आणि मिसळ कशी बनवायची हे शिका.”

हेही वाचा : ‘वेड’ला IFFA पुरस्कार मिळाल्याबद्दल रितेश देशमुखची खास पोस्ट, माधुरी दीक्षित म्हणाली…; अभिनेत्रीची कमेंट चर्चेत

त्यांचा हा मिसळ बनवतानाचा व्हिडीओ सर्वांना खूपच आवडला आहे. हा व्हिडीओ तिने शेअर केल्यावर काही तासांतच या व्हिडीओला लाखांच्या घरात व्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress madhuri dixit made misal pav with her husband shriram nene and shared video rnv