Mini Mathur opens up about Shefali Jariwala’s Death: अभिनेत्री शेफाली जरीवालाचे २७ जूनला निधन झाले. शेफालीच्या अकस्मात निधनाने इंडस्ट्रीमधील अनेकांसह चाहत्यांनादेखील धक्का बसला होता. तिचे निधन नेमके कशामुळे झाले,यावरही मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली अँटी एजिंगसाठी औषधे घेत होती. मात्र, तिच्या निधनाचे नेमके कारण काय, याबाबत पोलीस शोध घेत आहेत. आता अभिनेत्री आणि मॉडेल मिनी माथूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कलाकार वापरत असलेल्या अँटी एजिंग औषधांवर वक्तव्य केले.

“जे लोक अशा प्रकारचे औषोधपचार घेतात…”

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने महिलांच्या आरोग्याबाबत आणि दिसण्याबाबत त्यांच्यावर असलेल्या दबावाबाबत वक्तव्य केले. मिनी माथूर म्हणाली, “अशा औषधांमुळे समस्या निर्माण होत आहेत. यावर सार्वजनिकरित्या बोलले गेले पाहिजे. जेणेकरुन लोकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण झाली पाहिजे. जे लोक अशा प्रकारचे औषोधपचार घेतात त्यांना मी जज करत नाही. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की जर तुम्हाला आतुन छान वाटत नसेल, तर बाहेरून सुंदर दिसून काही उपयोग नाही.”

शेफालीच्या अचानक झालेल्या निधनाबाबत अभिनेत्री म्हणाली, “शेफालीचे निधन नेमके का झाले, हे माहित नसल्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. रिपोर्ट्समध्ये नेमके काय म्हटले आहे, याबाबत मला माहित नाही. इंटरनेटवर वाचलेल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय तिचा मृत्यू कशामुळे झाला, याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही.”

पुढे अभिनेत्री असेही म्हणाली, शेफाली वापरत असलेली औषधे अनेकजण वापरत आहेत. तुम्ही जी औषधे घेता ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतली पाहिजेत. कोणत्या औषधांचा तुमच्या शरीरावर कसे परिणाम होणार, हे तुम्हाला माहित नसते. कारण तुम्ही डॉक्टर नाही. तुम्ही निरोगी राहण्यासाठी औषधे घेण्यात काहीही गैर नाही. माझ्या ओळखीचे असे बरेच लोक आहेत जे ग्लूटाथिओनसारखे सप्लिमेंट्स घेतात. मला वाटते कोणत्याही प्रकारची औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाची आहे.”

“मी जेव्हा औषधे घेते, तेव्हा ती योग्य आहेत का? डॉक्टरांकडून ती योग्यप्रकारे दिली जातात का, याकडेदेखील लक्ष देते. मला ज्यावेळी इंजेक्शन घ्यायचे असते, तेव्हादेखील सीलबंद पॅकेजमधून बाहेर काढली गेली आहे का, हेही मी तपासते. या सगळ्याबद्दल मला भीती वाटते. खूप गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. मीसुद्धा खूप सप्लिमेंट्स घेते. मी एनर्जायझिंग ड्रिप्स घेतल्या आहेत, पण मी नेहमीच वैद्यकीय देखरेखीखाली या गोळ्या घेत असते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शेफालीच्या मृत्यूनंतर तिचा पती पराग त्यागी अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या भावना व्यक्त करताना दिसतो. शेफालीच्या आठवणीत तो अनेक गोष्टी करताना दिसतो.