कौटुंबीक पार्श्वभूमी अभिनय क्षेत्रातली नसूनही बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपल्या कामाच्या जोरावर स्थान निर्माण केलं. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि सुपरहिट चित्रपट दिले. अशीच एक अभिनेत्री आहे, जिने करिअरमध्ये सुपरहिट सिनेमे दिले, आघाडीच्या कलाकारांबरोबर काम केलं, केवळ हिंदीच नव्हे तर दाक्षिणात्य व भोजपुरी इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली, पण ही अभिनेत्री तिच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात राहिली. या अभिनेत्रीचं नाव नगमा आहे.

नगमा ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. नगमाने हिंदी चित्रपटांमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान सारख्या स्टार्ससह काम केलं. मग तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीकांत यांच्यासह अनेक कलाकारांबरोबर चित्रपट केले. त्यानंतर ती भोजपुरी चित्रपटांकडे वळली. तिने तिच्या करिअरमध्ये एकूण ८१ चित्रपट केले, पण ती चित्रपटांपेक्षाही वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली.

प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

एकेकाळी नगमा तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत होती. तिचं नाव भारतीय क्रिकेट संघाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीबरोबर जोडलं गेलं होतं. या बातम्या आल्या तेव्हा सौरव विवाहित होते, पण नगमा किंवा सौरवने याबाबत कधीच प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर नगमा भोजपुरी चित्रपटांकडे वळली. इथं तिने मनोज तिवारी आणि रविकिशन यांच्याबरोबर काम केलं. त्यांची जोडी हिट ठरली आणि नगमाचं नाव या दोन्ही स्टार्सशी जोडलं जाऊ लागलं. खरंतर हे दोन्ही स्टार्स विवाहित होते. मनोज तिवारींनी या प्रकरणी मौन बाळगलं, पण रविकिशन यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. आपल्याला नगमा खूप आवडते पण मी विवाहित आहे, असं रवीकिशन म्हणाले होते.

Video: चोप्रा कुटुंबाच्या नवीन जावयाला पाहिलंत का? प्रियांकाच्या बहिणीचा पती रक्षित केजरीवाल कोण आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय नगमाचं नाव सरथ कुमार नावाच्या व्यक्तीशीही जोडलं गेलं होतं, पण हे नातंही टिकू शकलं नाही. काही काळानंतर नगमाने चित्रपटसृष्टी सोडली आणि ती राजकारणात गेली. आता ती काँग्रेस पक्षाची सदस्य असून अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. ४९ वर्षीय नगमा अजूनही अविवाहित आहे, तिने लग्न केलेलं नाही.