‘हम हैं राही प्यार के’ हा चित्रपट ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि खूप गाजला. या चित्रपटात आमिर खान आणि नवनीत निशान प्रमुख भूमिकेत झळकले. या चित्रपटाला ३० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री नवनीत निशानने या चित्रपटाबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या. याचबरोबर यावेळी तिने आमिर खानबरोबर दिलेल्या किसिंग सीनवरही भाष्य केलं.

या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलं होतं. या चित्रपटात नवनीतने खलनायक बिजलानी म्हणजेच दिलीप ताहिलच्या मुलीची म्हणजेच ‘माया’ची भूमिका साकारली होती. तिला राहुल म्हणजेच आमिर खानशी लग्न करायचं असतं, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात आमिर खान आणि नवनीत निशान यांचा एक किसिंग सीन असणार होता. पण हा सीन नंतर चित्रपटातून काढून टाकण्यात आला. याबद्दल तिने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.

आणखी वाचा : “आमिर खान मानसिकदृष्ट्या अस्थिर…,” प्रसिद्ध अभिनेत्याने केलं मिस्टर परफेक्शनिस्टला लक्ष्य, ट्वीट चर्चेत

ती म्हणाली, “आमिर तर आमिरच आहे. त्याने मला दिवसभर किसिंग सीन करायला लावले होते. किसमध्ये सातत्य असायला हवं, असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे मी आमिरच्या गालावर अनेकदा किस केलं आणि दिवसभर सराव केला. अशा स्थितीत दिवसभरात मी त्याच्या गालावर ७ ते ८ वेळा किस केलं होतं.”

हेही वाचा : Video: सलमानने ईदनिमित्त त्याच्याकडची ‘ही’ मौल्यवान वस्तू आमिर खानला दिली भेट? व्हिडीओ चर्चेत

यानंतर ती असंही म्हणाली की, जेव्हा मी आमिर खानच्या घरून आले तेव्हा मी सर्वांना सांगितलं की, मी आमिर खानला दिवसभर किस केलं. मी लॉटरी जिंकले आहे.” नवनीतचं हे बोलणं आता चर्चेत आलं आहे.