अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. लग्न झाल्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. तर आता तिथे ती तिचा पती निक जोनास आणि तिची लेक मालती मेरी यांच्याबरोबर राहत आहे. आता प्रियांकाने मालती मेरीचा एक कॅन्डीड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण तो फोटो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

गेल्या वर्षी प्रियांका आणि निक सरोगसीद्वारे आई-वडील झाले. लेक मालती मेरीबद्दलच्या विविध गोष्टी प्रियांका सोशल मीडियावरून अनेकदा शेअर करताना दिसते. मालती मेरीची काय प्रगती सुरू आहे हे ती तिच्या चाहत्यांना वरचेवर दाखवत असते. आता नुकतेच तिने काही फोटो शेअर केले. त्या फोटोंमध्ये मालती मेरीच्या हातात दिसणाऱ्या पर्सची किंमत समोर आल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आणखी वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांकाने त्यांच्या नुकत्याच झालेल्या फॅमिली ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये प्रियांका, निक आणि मालती मेरीबरोबरच इतर कुटुंबीयही दिसत आहेत. तर यातील अनेक फोटोंमध्ये मालती मेरीही आहे. त्यातील एका फोटोमध्ये ती हिरव्या रंगाच्या पर्समध्येबरोबर खेळताना दिसत आहे. या फोटोने आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे. याचं कारण म्हणजे या फोटोमध्ये मालती मेरीच्या हातात दिसणारी ती छोटीशी हिरव्या रंगाची पर्स थोडीथोडकी नसून तब्बल २ लाख ४५ हजारांची आहे. ही पर्स बुलगारी या लक्झरी ब्रॅण्डची आहे.

हेही वाचा : याला म्हणतात संस्कार! आजोबांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रियांका चोप्राची लेक त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक, अभिनेत्री म्हणाली

आता तिचे हे फोटो खूप व्हायरल होत असून यावर कमेंट करीत नेटकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. याचबरोबर तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे हे फोटो आवडल्याचंही कमेंट करत सांगितलं आहे.