जगातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. सध्या या सोहळ्याची सातत्याने चर्चा पाहायला मिळत आहे. या सोहळ्याला बॉलिवूडमधील सिनेतारकांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीने या सोहळ्याला चार चांद लागले. या सोहळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकतंच या कार्यक्रमादरम्यान एक इनसाईड व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रियांका चोप्रा, निक जोनस, रणवीर सिंह, गौरी खान पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत प्रियांका आणि रणवीर हे ‘गल्ला गुड़िया’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
आणखी वाचा : Video : भर पार्टीत दीपिका पदुकोणने केले ऐश्वर्या रायला किस, बेभान होऊन नाचतानाचा व्हिडीओ समोर

या गाण्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या प्रतिक्रियाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रणवीर आणि प्रियांका थिरकत असताना गौरी खान ही त्या दोघांच्या परफॉर्मन्स आनंद घेताना दिसत आहे. यावेळी गौरी ही हसत हसत त्या दोघांना प्रतिसाद देत आहे. तसेच या गाण्यावर गौरी ही थिरकतानाही दिसत आहे.

आणखी वाचा : “हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड चांगले” शाहरुखच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियांका चोप्राचा संताप, म्हणाली “डोक्यात हवा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने बॉलिवूडबद्दल मोठे वक्तव्य केले होते. “बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता”, असे तिने म्हटले होते. त्यानंतर आता प्रियांका ही भारतात परतली आहे.