काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्याने आत्महत्या केली. या प्रकरणात त्याच्या गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप झाले आणि तिला तुरुंगात जावं लागलं. आत्महत्या प्रकरणात क्लिन चीट तर मिळाली, पण तिचं करिअर संपलं. इतकंच नाही तर तिच्या भावाचंही करिअल संपुष्टात आलं. आधीच करिअरमधील सगळेच सिनेमे फ्लॉप, त्यात वैयक्तिक आयुष्यामुळे आलेल्या या वादळामुळे ती खूप चर्चेत राहिली. पण तिने न खचता व्यवसायत नशीब आजमावलं. आता तिचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे.

फोटोमध्ये दिसणारी ही तरुणी म्हणजे रिया चक्रवर्ती होय. खरं तर रिया तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली, त्या काळात रिया त्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. सुशांतने २०२० मध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात रियाचं नावही आलं. तिच्यावर ड्रग्जचे सेवन करण्याचे, सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आणि मनी लाँडरिंगचे आरोप झाले. या प्रकरणात रियाबरोबर तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीही अडकला. दोघांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं. या प्रकरणात नंतर रिया व शौविक दोघांना क्लिनचिट मिळाली. पण या घटनेनंतर रियाचं करिअर बरबाद झालं. आता रिया पुन्हा एकदा तिचं करिअर रुळावर आणण्याचा प्रयत्न करतेय.

रिया चक्रवर्तीचा आज ३३ वा वाढदिवस आहे. रियाचा जन्म १ जुलै १९९२ रोजी बंगाली कुटुंबात झाला. तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. तिच्या आईचं नाव संध्या चक्रवर्ती आहे. रियाने VJ म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. रियाचं आयुष्य प्रचंड चढ-उतारांनी भरलेलं राहिलं.

१२ वर्षांत ८ चित्रपट, सगळेच फ्लॉप

व्हीजे झाल्यानंतर रियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. २००९ मध्ये ती एमटीव्ही इंडियाच्या ‘टीव्हीएस स्कूटी टीन दिवा’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली. त्यानंतर २०१२ मध्ये रियाने तेलुगू चित्रपट ‘तुनीगा तुनीगा’मधून अभिनयात पदार्पण केलं. हा चित्रपट फ्लॉप झाला. २०१३ मध्ये ‘मेरे डॅड की मारुती’तून तिने बॉलीवूड पदार्पण केलं. पण, तोही फ्लॉप झाला. मग ती ‘सोनाली केबल’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘जलेबी’ ते ‘चेहरे’ अशा ८ चित्रपटांमध्ये दिसली पण तिचा एकही हिट झाला नाही. महेश भट्ट देखील तिचे करिअर वाचवू शकले नाहीत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर रियाला तुरुंगात काढावे लागले दिवस

फिल्मी करिअरला फ्लॉपचं ग्रहण लागलेलं असतानाच रिया चक्रवर्तीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं. ती सुशांत सिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती, दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. याच काळात सुशांतने आत्महत्या केली. रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे, ड्रग्ज घेण्याचे व मनी लाँडरिंगचे आरोप झाले. तिला २७ दिवस तुरुंगात राहावं लागलं. सुशांत प्रकरणामुळे रियाचं वैयक्तिक आयुष्य आणि फिल्मी करियर दोन्ही बरबाद झाले. सुशांत आत्महत्या प्रकरणात नंतर तिला क्लिन चीट मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यवसायाकडे वळली रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती आता बिझनेसवूमन झाली आहे. तसेच ती तिचं फिल्मी करिअर पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करतेय. ती रोडीजमध्ये झळकली होती. आता तिने ‘चॅप्टर 2’ नावाने कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. तिची कंपनी आता कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतेय. सुशांतमुळे फिल्मी करिअर संपलं, कोणीच काम देत नव्हतं. तिचा भाऊ शौविकचं एमबीएनंतरचं करिअरही संपलं. त्यामुळे या दोन्ही भावंडांनी स्वतःची कंपनी सुरू केली. या कंपनीची व्हॅल्यूएशन आता जवळपास ४० कोटी रुपये आहे.