मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सई नेहमी तिचे नवनवीन फोटोशूट चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सईने केलेल्या एका कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आणि त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सईचा हा व्हिडिओ ‘फिल्मी ग्यान’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सई प्लॅस्टिकचे मोबाईल कव्हर विकणाऱ्या मुलाकडे जाते आणि त्याच्याकडून एक कव्हर घेते. त्यानंतर त्याला पैसे देते. मुलाकडून घेतलेला तो कव्हर आपल्या मोबाईलला घालून ती निघून जाते. सईच्या याच कृतीने सगळ्यांचे सगळे वेधून घेतले आहे. नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा – ‘पीके’ फेम अभिनेत्रीचं दुसरं लग्न मोडलं, १३ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय; म्हणाली…

हेही वाचा – Video: अभिनेत्री अदा शर्मानं आषाढी एकादशीनिमित्तानं दिल्या खास शुभेच्छा; गायलं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं

सईने त्या मुलाला लपवून दिलेल्या पैशाच्या कृतीवर नेटकरी बोलत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘ती खूप चांगल्या मनाची आहे. तिने त्या मुलाला अधिकचे पैसे दिले. पण तिने ते कॅमेरापासून लपवून दिले. जेणेकरून आपण कोणाला तरी मदत करतोय हे कळू नये. देवाचे आशीर्वाद तिच्यावर सदैव राहो.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘पैसे देण्याची पद्धत खूप चांगली आहे. अजिबात दिखावा केला आहे.’

हेही वाचा – ‘कौन बनेगा करोडपती १५’मध्ये होणार मोठा बदल, बिग बींनी केलं जाहीर; पाहा नवा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सईने सलमान खानच्या ‘दबंग ३’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सई ‘मेजर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. आता सई अजय देवगणच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.