scorecardresearch

“तुझ्यात मजा नाही…” जेव्हा बॉलिवूड अभिनेत्याने समीरा रेड्डीवर केली होती अश्लील टीका

‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

“तुझ्यात मजा नाही…” जेव्हा बॉलिवूड अभिनेत्याने समीरा रेड्डीवर केली होती अश्लील टीका
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

अभिनेत्री समीरा रेड्डी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समीरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. समीराने आई झाल्यानंतर तिने अभिनयाकडे पाठ फिरवली. चित्रपटसृष्टीत कार्यरत असताना तिलादेखील कास्टिंग काऊच प्रकाराला सामोरे जावे लागले होते.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून तिने आपल्या करियरला सुरवात केली. इतर अभिनेत्रींप्रमाणे तिलादेखील कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की “मी एक चित्रपट करत होते मला अचानक सांगण्यात आले की तुला या चित्रपट किसिंग सीन द्यायचा आहे. मात्र असा सीन आधी चित्रपट नव्हता. मला हे पटत नव्हते”, तेव्हा निर्माते मला म्हणाले “तू आधी मुसाफिर चित्रपटात असा सीन दिला आहेस यात द्यायला हरकत काय?” मी आधी असा सीन दिला म्हणजे प्रत्येक चित्रपटात देईन असा अर्थ होत नाही. तेव्हा मला सांगण्यात आले की “हे खूप काळजीपूर्वक हाताळ पण लक्षात ठेव आमच्याकडेदेखील दुसरा कलाकार आहे.”

शाहरुख-दीपिकाच्या ‘बोल्ड’ गाण्यावर विवेक अग्निहोत्रींची अप्रत्यक्ष टीका, म्हणाले “इन्स्टाग्राम रिल्स…”

समीराने एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल आलेला अनुभवदेखील सांगितला आहे, ती पुढे म्हणाली, “एका अभिनेत्याने मला सांगितले की तू कंटाळवाणी आहेस, तुझ्या मज्जा नाही, तसेच मी तुझ्याबरोबर पुढे काम करेन की नाही माहित नाही” अशी त्याची माझ्याबद्दलची प्रतिक्रिया होती. अभिनेत्रीने त्या अभिनेत्याचे नाव घेतले नाही.

समीराने २००२ मध्ये सोहेल खानबरोबर ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. समीराने हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. समीराने २०१४ मध्ये बिजनेसमॅन अक्षय वर्देशी लग्न केले. त्यांच्या मुलाचे नाव हे हंस आणि मुलीचे नाव नायरा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 10:01 IST

संबंधित बातम्या