मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘चांदनी बार’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. तब्बूची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला होता. आता २४ वर्षांनंतर ‘चांदनी बार’ या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

२०१८ पासून ‘चांदनी बार’ या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरू होती. अखेर मोहन आजाद यांनी या सिक्वेलची घोषणा केली आहे. पण यात एक मोठा बदल होणार आहे. ते म्हणजे ‘चांदनी बार’ या चित्रपटाच्या सिक्वेलच्या दिग्दर्शनाची धुरा मधुर भांडारकर नाही तर मोहन आजाद यांच्याकडे असणार आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चांदनी बार’ चित्रपटाची पटकथा मोहन यांनी लिहिली होती.

हेही वाचा – ‘अ‍ॅनिमल’नंतर आता तृप्ती डिमरी विकी कौशलसह देणार ‘बॅड न्यूज’, पाहा करण जोहरच्या नव्या चित्रपटाचा पहिला लूक

‘चांदनी बार’ चित्रपटात अभिनेत्री तब्बूसह अतुल कुलकर्णी, अनन्या खरे, राजपाल यादव, मीनाक्षी साहनी आणि विशाल ठक्कर महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. आता हेच कलाकार सिक्वेलमध्ये पाहायला मिळणार की नाही, हे गुलदस्त्यात आहे. पण सिक्वेलच्या चित्रपटाची पटकथा जवळपास पूर्ण झाली असून कास्टिंग देखील अंतिम टप्प्यात आहे. यानंतर वर्षाच्या मध्यावर निर्माते चित्रपट चित्रीकरण सुरू करण्यासाठी तयार आहेत.

हेही वाचा – मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री चार वर्षांनंतर अमेरिकेहून परतली भारतात, गोदावरीच्या काठेवरील कुटुंबासहचे फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘चांदनी बार’च्या सिक्वेलबाबत मोहन आजाद म्हणाले की, या चित्रपटाचे निर्माते आर. मोहन यांनी ‘चांदनी बार’च्या सिक्वेलसाठी खूप आधीच इच्छा व्यक्त केली होती. आम्ही सिक्वेलच्या कथेबद्दल खूप गोंधळलो होतो. पण आता आमची कथा जवळपास लिहून झाली आहे, याचा मला आनंद आहे. ‘चांदनी बार’चा सिक्वेल जबरदस्त बनवला जाणार आहे. येत्या वर्षात आपण ‘चांदनी बार’च्या त्याच यशाची पुनरावृत्ती करू, अशी मला आशा आहे. या चित्रपटाचा सिक्वेल डिसेंबर २०२५ला प्रदर्शित होणार आहे.