संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सुपरहिट ठरला. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर अभिनीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटातील संवाद, गाणी हिट ठरली. मात्र या चित्रपटात लक्षवेधी ठरली ती भाभी २ म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी. तृप्तीने या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘अ‍ॅनिमल’नंतर आता तृप्ती प्रेक्षकांना ‘बॅड न्यूज’ द्यायला देत आहे.

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने नुकतीच नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘बॅड न्यूज’ असं आहे. याच चित्रपटात तृप्ती डिमरीसह विकी कौशल आणि एमी विर्क झळकणार आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Karsandas Mulji journalist praised by Modi Netflix Maharaj film controversy
आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुलजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?
Hrithik Roshan starrer lakshya turns 20 year producer announces re release movies
हृतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ला २० वर्षे पूर्ण; करिअरच्या शोधात भटकलेल्या तरुणाची कथा पुन्हा पाहता येणार मोठ्या पडद्यावर, कधीपासून जाणून घ्या…
bai ga movie first song Jantar Mantar Bai Ga
Video : “जंतर मंतर बाई गं…”, सहा अभिनेत्री अन् एक हिरो! ‘बाई गं’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Marathi Film Festival during July 2728 in California
कॅलिफोर्नियामध्ये २७२८ जुलै दरम्यान मराठी चित्रपट महोत्सव
aishwarya narkar favorite actor arun sarnaik (1)
ऐश्वर्या नारकर ७० च्या दशकातील ‘या’ मराठी अभिनेत्याच्या आहेत चाहत्या, आवडता चित्रपट अन् गाणं जाणून घ्या…
Cannes International Film Festival All We Imagine As Light movie
आनंददायी कानपर्व
“…असं मुस्लीम कुटुंब दाखवा अन् ११ लाख जिंका”, ‘त्या’ हिंदी चित्रपटावरील वादानंतर जितेंद्र आव्हाडांची घोषणा
kan award
पायल कपाडियाची ऐतिहासिक कामगिरी; ‘कान’मध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ला ‘ग्रां प्री’ पुरस्कार

हेही वाचा – मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री चार वर्षांनंतर अमेरिकेहून परतली भारतात, गोदावरीच्या काठेवरील कुटुंबासहचे फोटो व्हायरल

२०१९मध्ये अक्षय कुमार, करीना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गुड न्यूज’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्यानंतर ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. करण जोहरने चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे, “एंटरटेनिंग हंगामासाठी तयार राहा. एक कॉमेडी चित्रपट येत आहे, जो सत्य घटनेवर आधारित आहे. ‘बॅड न्यूज’ १९ जुलै २०२४ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.”

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापने शेअर केला प्राजक्ता माळीबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “मग कर्जतचं फार्म हाऊस…”

दरम्यान, ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या पहिल्या लूकवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तृप्ती, विक्की, एमीच्या या नव्या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं नेटकऱ्यांनी करण जोहरच्या पोस्टवर लिहिलं आहे.