अभिनेत्री उर्वशी रौतेला ही विविध कारणांमुळे चर्चेत असते. मध्यंतरी तिचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडले गेले होते. पण त्या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर आता ती एका लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या आधी होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे लग्न उर्वशीचं नाही तर तिच्या आत्ते भावाचं लग्न आहे. एका मीडिया वृत्तानुसार या लग्नासाठी ती उत्तराखंडमधील जयहरीखाल येथे गेलीआहे. तिच्या या गावी पोहोचल्यानंतर ती सिद्धबली मंदिरात गेली होती. याठिकाणी पूजापाठ केल्यानंतर ती भावाच्या लग्नातील विधींमध्ये सहभागी झाली आहे.

आणखी वाचा : प्रदर्शनाआधीच भारतात ‘अवतार २’चा जलवा, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भावाबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यासोबतच या कार्यक्रमातील उर्वशीचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या भावाच्या हळद समारंभासाठी तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसंच या पिवळ्या ड्रेसला त्यावर शोभेल अशी ज्वेलरीही परिधान केली आहे. ती हळद समारंभ मनापासून एन्जॉय करताना असून तिच्या भावल हळद लावताना दिसत आहे.

हेही वाचा : उर्वशी रौतेला परतली मायदेशी; फोटो पोस्ट करत म्हणाली, “माझं हृदय तुटतंय कारण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान २०२३ हे वर्ष उर्वशीसाठी खूप खास असणार आहे. पुढील वर्षी उर्वशी वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. रणदीप हुड्डाच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या सिनेमातही उर्वशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याव्यतिरिक्त ती राम पोथिनेनीबरोबर एका चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.