टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यातील वादामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने पती आदिल खान दुर्राणीवर धक्कादायक आरोप केले होते. याचवेळी तिने त्याच्या कथित सीक्रेट गर्लफ्रेंडबद्दलही सांगितलं होतं. आदिल खानच्या गर्लफ्रेंडचं नाव तनु चंडेल असल्याचं सांगत ती आपलं वैवाहिक आयुष्य खराब करत असल्याचं राखीने म्हटलं होतं. त्यानंतर आता पहिल्यांदाच तनु चंडेलनं या सर्व आरोपांवर मौन सोडलं आहे.

राखी सावंतने काही दिवसांपूर्वीच आदिल खानची कथित गर्लफ्रेंड तनुच्या नावाचा खुलासा करताना, जेव्हा ती मराठी बिग बॉसमध्ये होती तेव्हा तनु आणि आदिल रिलेशनशिपमध्ये आल्याचं म्हटलं होतं. राखीने आदिलच्या शरीरावर लव्हबाइट पाहिले होते. “तनुने माझं आयुष्य खराब केलं. तिने माझं घर उध्वस्त केलं तर तिचंही चांगलं होणार नाही. जो आपल्या पत्नीचा झाला नाही तो दुसऱ्या कोणाचाही होणार नाही.” असं म्हणून राखीने तिला शाप दिला होता.

आणखी वाचा- राखी-आदिल खानच्या वादात एक्स गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य; म्हणाली, “या सगळ्यात माझं…”

आता तनुने इन्स्टाग्राम स्टोरीवर राखी-आदिल वादावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय, “राखी मी तुला आणि तुझ्या मित्रपरिवाराला आधीच सांगितलं आहे की मी तुझ्या आदिलबरोबर नाही आहे. हे सर्व समजल्यानंतर मी आदिलची बाजूही घेणार नाही. हा तुझा आणि तुझ्या पतीमधला वाद आहे. मला यात विनाकारण खेचू नका.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
tanu chandel instagram

दरम्यान याआधी आदिल खानची एक्स गर्लफ्रेंड रोशिनानेही या दोघांच्या वादावर प्रतिक्रिया दिली होती. तिनेही इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. “मी आदिल आणि राखी यांना आनंदी पाहू इच्छिते याचा हा पुरावा आहे. जेव्हा मला समजलं की ते दोघंही विवाहित आहेत मला खूप आनंद झाला. त्यामुळे मी भारतीयांना विनंती करते की या सगळ्यात मला खेचण्याचा प्रयत्न करू नका. मला काही दिवसांपासून या प्रकरणाशी संबंधी मेसेज केले जात आहेत. पण या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही.” असं तिने म्हटलं होतं.