Adipurush Box Office Collection Day 7: वीकेंडचे तीन दिवस दमदार कमाई केल्यानंतर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली आहे. चित्रपटाच्या कमाईत सोमवारपासून सुरू असलेली घट अद्यापही कायम आहे. चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चित्रपट लवकरच थिएटर्समधून गाशा गुंडाळेल, असं दिसत आहे. सहाव्या दिवसापेक्षाही सातव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचे आकडे घटले आहेत.

हेही वाचा – सहाव्या दिवशी ‘आदिपुरुष’चा गेम ओव्हर, कमाईत मोठी घट झाल्यानंतर निर्मात्यांनी ‘या’ ऑफरची केली घोषणा

Parbhani collage going boy earn 60 thousand in month by selling pizza
परभणीचा पठ्ठ्या वयाच्या १७व्या वर्षी महिन्याला कमावतोय ६० हजार; असं करतो तरी काय? VIDEO पाहून व्हाल अवाक्
article 20 in constitution of india article 20 protection in respect of conviction for offences zws
संविधानभान : एक गुन्हा, एक खटला, एक शिक्षा
9th anniversary of Manachi organization
‘मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात
yogendra yadav article review phase 3 voting of lok sabha elections for 93 seats
कलाटणी देणारा तिसरा टप्पा…
How To burn calories 24 Hours lose weight Even while resting
२४ तास कॅलरीज बर्न होतील, आराम करतानाही! फक्त दिवसातून ‘या’ ५ हालचाली करा! डॉ. मेहतांनी सांगितला फंडा
Surya Gochar 2024
३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? सूर्यदेवाच्या कृपेने नव्या नोकरीसह तुम्हाला कधी मिळणार प्रचंड धनलाभ?
Prajwal Revanna Rape Victime
“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
Mukta barve Namrata sambherao nach ga ghuma movie first day collection
‘बाईपण भारी देवा’पेक्षा ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

तब्बल ६०० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई करू शकला आहे. कमाईत सातत्याने होणारी घसरण पाहता चित्रपट वीकेंडला मुसंडी मारण्याची शक्यता दिसत नाही. सुरुवातीला नकारात्मक रिव्ह्यू आणि वादग्रस्त संवादामुळे चित्रपटाविरोधात प्रेक्षकांचा प्रचंड रोष पाहायला मिळाला. मात्र तरीही चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात १४० कोटींचा व्यवसाय केला होता. आता सातव्या दिवशी चित्रपटाने फक्त ५.५० कोटींची कमाई केली.

हेही वाचा – कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

चित्रपटाच्या घटत्या कमाईमुळे निर्मात्यांनी २२ जून आणि २३ जून या दोन दिवसांसाठी थ्रीडी तिकिटांची किंमत कमी केली आहे. ‘आदिपुरुष’ची 3D तिकिटं फक्त १५० रुपयांमध्ये मिळतील, अशी घोषणा करण्यात आली. पण, २२ तारखेला तर त्याचाही फायदा झाल्याचं दिसत नाही. सहाव्या दिवशी साडेसात कोटींची कमाई करणारा चित्रपट सातव्या दिवशी साडेपाच कोटींचा गल्ला जमवू शकला.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी दिली मुलांच्या कामांबद्दल माहिती, म्हणाले, “पार्थेशने दोन वर्षे…”

चित्रपटाची एकूण कमाई आता २६० कोटी झाली आहे. पुढचे दोन दिवस वीकेंड आहे. तर, या दिवसांत चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान व देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला होता.