प्रभास आणि सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांवरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरच नाही, तर सैफ अली खानपासून ते क्रिती सेनॉनपर्यंतच्या लूकवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास ‘राम’ची भूमिका साकारत आहे, तर क्रिती सेनन ‘सीताची भूमिका साकारत आहे आणि सैफ अली खान ‘रावण’ची भूमिका साकारत आहे. प्रत्येक कलाकाराने या चित्रपटासाठी मोठी फी आकारल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभासपासून क्रिती सेनेनपर्यंत प्रत्येक कलाकाराने चित्रपटासाठी किती मानधन घेतलं याचा आकडा समोर आला आहे.

हेही वाचा- “जाड असणं म्हणजे..”; करीना कपूरने उडवली होती विद्या बालनच्या वजनाची खिल्ली; म्हणालेली, “मी कधीही…”

रिपोर्ट्सनुसार, प्रभासने रामची भूमिका साकारण्यासाठी भलमोठी रक्कम आकारली आहे. चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा प्रभासच्या फीबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, प्रभासने या चित्रपटासाठी जवळपास १०० कोटी रुपये घेतले आहेत. बाहुबली आणि बाहुबली २ च्या यशानंतर प्रभासने त्याची फीमध्ये वाढ केली आहे. या मानधनानंतर प्रभास  या चित्रपटातील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे.  

सैफ अली खानच्या फीबद्दल बोलायचे झाले तर सैफला ‘आदिपुरुष’ चित्रपटात ‘रावण’ची भूमिका करण्यासाठी १२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर क्रिती सेननने फक्त ३ कोटी रुपये घेतले आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात ‘लक्ष्मण’ची भूमिका साकारणाऱ्या सनी सिंगला १.५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय सोनल चौहान यांना ५० लाख रुपये देण्यात आले आहेत.

हेही वाचा- पूजा हेगडेने पहिल्या भेटीत सलमान खानला म्हटलं होतं ‘भाई’; हे ऐकताच अभिनेता म्हणाला, “तू मला..”

टी-सिरिज आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. या फोटोमध्ये टी-सिरिजचे मालक भूषण कुमार आणि दिग्दर्शक ओम राऊतही आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही पोस्ट शेअर करत ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात ३डी मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट सर्वप्रथम ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. पण काही तांत्रिक कारणास्तव आणि लोकांचा विरोध पाहता याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या चित्रपटात प्रभास हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर सीता मातेच्या भूमिकेत क्रीती सनॉन झळकणार आहे. याबरोबरच सैफ अली खान यात रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ओम राऊत यांनी याआधी ‘लोकमान्य एक युगपुरुष’ आणि ‘तान्हाजी’सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.