ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला अन् पहिल्याच दिवसापासून तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. प्रेक्षक चित्रपटातील कलाकार लेखक तसेच दिग्दर्शकावर प्रचंड टीका करीत आहेत. पहिल्या तीन दिवसांत जबरदस्त कमाई करणाऱ्या ‘आदिपुरुष’ला ११ दिवसांत आपल्या बजेटच्या निम्मे पैसेही वसूल करता आलेले नाहीत.

खासकरून चित्रपटातील हनुमानाच्या तोंडी असलेल्या संवादांवर लोकांनी आक्षेप घेतला अन् लेखक मनोज मुंतशीर शूक्ला यांना यासाठी जबाबदार ठरवलं. बऱ्याच मुलाखतीमध्ये या चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी हे संवाद आजच्या पिढीला समोर ठेवून लिहिल्याचंही कबूल केलं. या चित्रपटामुळे मनोज मुंतशीर हे नावही चांगलंच चर्चेत आलं आहे. ज्या संवादलेखनामुळे आज मनोज यांना ट्रोल केलं जात आहे एकेकाळी त्याच लिखाणामुळे मनोज यांचं लग्न मोडलं होतं.

आणखी वाचा : “मी डेटॉलने गुळण्या केल्या…” नीना गुप्ता यांनी सांगितली पहिल्या किसिंग सीनची आठवण

कपिल शर्माबरोबरच्या एका मुलाखतीमध्ये मनोज यांनी त्यांच्या या मोडलेल्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. १९९७ मध्ये मनोज यांचं लग्न ठरलं होतं, पत्रिकाही छापल्या होत्या. त्यावेळी मुलीच्या भावाने जेव्हा मनोज यांना पुढील करिअर प्लॅनबद्दल विचारलं तेव्हा मनोज यांनी गीतकार आणि लेखक व्हायचं असल्याचं सांगितलं. तेव्हा त्या भावाने मनोज यांना विरोध केला अन् लग्न किंवा करिअर यापैकी एक पर्याय निवडायला सांगितला.

View this post on Instagram

A post shared by Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हा मनोज यांनी आपल्या लिखाणाची साथ द्यायचा निर्णय घेतला आणि यामुळे बरोबर एक महिना आधी मनोज यांचं लग्न मोडलं. अर्थात याचं मनोज यांना वाईट वाटलं पण नंतर त्यांना योग्य जोडीदार मिळाला. मनोज यांनी निलमशी लग्न केलं जी स्वतः एक लेखिका आहे, आज त्यांना अरु शूक्ला नावाचा गोड मुलगाही आहे. गीतकार, कवि अन् पटकथालेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनोज मुंतशीर यांनी बरेच रीयालिटि शोज, चित्रपटामध्ये लेखक म्हणून काम केलं आहे. ‘आदिपरूष’मुळे मनोज हे पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत.