Aditya Roy Kapur : बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार रोमँटिक हीरो म्हणून ओळखले जातात. त्यातीलच एक आदित्य रॉय कपूर. ‘आशिकी २’मध्ये आदित्यनं साकारलेल्या भूमिकेनं अनेक तरुणींच्या काळजात घर केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांत तो रोमँटिक अभिनेत्याच्या भूमिकेतून समोर आला. आदित्य रुपेरी पडद्यावर अगदी सच्चा प्रेमी म्हणून सर्वांना दिसला आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात अनेक सुंदर अभिनेत्रींनी त्याच्या हृदयात घर केलं. आजचा दिवस आदित्यसाठी फार खास आहे. कारण- आज त्याचा वाढदिवस आहे. त्यामुळे आपण आदित्य सिनेविश्वातील किती आणि कोणकोणत्या अभिनेत्रींच्या प्रेमात पडला आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

अनन्या पांडे

आदित्य रॉय कपूरचं नाव सुरुवातीला अनन्या पांडेबरोबर जोडलं गेलं. बॉलीवूडमध्ये अनेक कार्यक्रमांत दोघांना एकत्र पाहिलं गेलं. या दोघांच्या डेटिंगची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. अनन्या आदित्यपेक्षा तब्बल १३ वर्षं लहान आहे. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

हेही वाचा : पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण

u

श्रद्धा कपूरसाठीही धडकलं आदित्यचं हृदय

आदित्य रॉय कपूरचा ‘आशिकी २’ चित्रपट आजही अनेक चाहते आवडीने पाहतात. त्यामध्ये श्रद्धा कपूरबरोबर त्याची केमिस्ट्री चांगली रंगली होती. रुपेरी पडद्यावर झळकल्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. बी-टाउनमध्ये आदित्य रॉय कपूर श्रद्धा कपूरला डेट करीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, काही दिवसांनी दोघांनीही या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं.

रिया चक्रवर्तीसाठीही हृदयात वाजलं समथिंग

रोमँटिक हिरो आदित्य रॉय कपूरचं नाव रिया चक्रवर्तीबरोबर जोडलं गेलं होतं. सुशांतला डेट करण्याआधी रिया चक्रवर्ती आदित्य रॉय कपूरबरोबर अनेकदा दिसली होती. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, मीडियासमोर दोघांनीदेखील आम्ही एकमेकांचे फार चांगले मित्र आहोत, असं म्हटलं होतं.

‘फितूर’ चित्रपटानंतर कतरिना कैफच्या प्रेमात

आदित्यच्या या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचं नावसुद्धा आहे. आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ या दोघांनी फितूर या चित्रपटासाठी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. चित्रपटाची शूटिंग सुरू असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्यावर दोघांनीही कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. दरम्यान, काही दिवसांनी कतरिना कैफचं विक्की कौशलबरोबर लग्न झालं आणि या चर्चेला ब्रेक लागला.

हेही वाचा : ‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाक्षी सिन्हा

कतरिना कैफ, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती, अनन्या पांडे या अभिनेत्रींप्रमाणेच या यादीमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं नावसुद्धा आहे. सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर ‘कलंक’ चित्रपटात एकत्र झळकले होते. त्यावेळी दोघं एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, नंतर सोनाक्षीचा विवाह झाला आणि आता ती तिचं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करीत आहे.