बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या त्याच्या ‘द नाईट मॅनेजर’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. आदित्यने गेल्या आठवड्यात या वेब सीरिजच्या मुंबईतील स्पेशल स्क्रीनिंगसाठी हजेरी लावली होती. यावेळी एका चाहतीने त्याला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला होता. आदित्यचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

आदित्यला बघितल्यानंतर भारावून गेलेल्या चाहतीने त्याच्याबरोबर सेल्फी घेतल्यानंतर जबरदस्तीने त्याला किस करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आदित्यने त्या चाहतीला बाजूला केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या चाहतीला ट्रोल केलं होतं. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आदित्यने या प्रकरणावर भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “खरं सांगायचं तर त्या संपूर्ण प्रकरणामुळे मी अजिबात आश्चर्यचकित किंवा निराश झालो नाही. ती चाहती फारच स्ट्राँग होती. पण, मला ती परिस्थिती हाताळावी लागली. मी तिच्या भावना समजू शकतो”.

हेही वाचा>> ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; विजेत्याला मिळणार ‘इतके’ कोटी रुपये जिंकण्याची संधी

“मी तिच्यावर टीकाही करणार नाही किंवा ते चुकीचं होतं, असंही म्हणणार नाही. माझ्याप्रती वाटणाऱ्या आपुलकी व प्रेमाच्या त्या भावना होत्या, असं मला वाटतं. तिच्या भावना तिने अशाप्रकारे व्यक्त केल्या. तेव्हा परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली पाहिजे, असं मला वाटलं. पण मी या संपूर्ण प्रकरणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही”, असंही पुढे आदित्य म्हणाला.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’ने १००० कोटींची कमाई केल्यानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली “बॉयकॉट गँग…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेब सीरिजमधील त्याने साकारलेल्या शान कपूर या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. द नाईट मॅनेजर वेब सीरिजमध्ये आदित्यबरोबर अनिल कपूर, जगदिश राजपुरोहित या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत .