‘सडक २’ आणि ‘बाटला हाऊस’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिसन परेराला खोट्या प्रकरणात शारजामध्ये अडकवल्यानंतर गुन्हे शाखेच्या प्रयत्नामुळे ती भारतात परतली आहे. आंतरराष्ट्रीय वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली अभिनेत्री क्रिसन परेराला शारजाला पाठवून अंमलीपदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते.

शारजामध्ये अटक झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी वाकोला पोलिसांकडे तक्रार केली. वाकोला पोलिसांनी राजेश दामोदर बोभाटे ऊर्फ रवी ऊर्फ प्रसादराव व ॲन्थोनी ॲलेक्स पॉल या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी शारजामधून क्रिसनला सोडवण्यासाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मागणी केली होती.

आणखी वाचा : अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘OMG 2’च्या ट्रेलरचं प्रेक्षक करतायत कौतुक; म्हणाले, “यावेळी ‘गदर २’ ला…”

क्रिसनचा विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये क्रिसन विमानतळावर तिच्या वडिलांना आणि भावाला बिलगली असून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत आहेत. क्रिसनच्या आईने त्यांच्याबरोबर तिच्या लाडक्या पाळीव कुत्र्यालादेखील आणले आहे. तीचान भाऊ केविनने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kevin Pereira (@kevin.pereira_kmlp)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिंदुस्तान टाईम्स’शी संवाद साधताना क्रिसनने जेलमध्ये कसे दिवस काढले याबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “मी रोज स्वतःला धीर देत होते की आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. १७ दिवसांनी जेव्हा मी माझ्या आई-वडिलांशी फोनवर बोलले आणि त्यांनी मला आणखी धीर दिला, त्यांनी मला माझ्या केसबद्दल सगळी माहिती दिली. जेलमध्ये इतर कैद्यांशीही मी बोलायचे. मानसिक संतुलन कायम ठेवण्यासाठी मी व्यायामही करायचे.” याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे.