बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आलिया भट्ट व रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले. ६ नोव्हेंबरला आलियाने तिच्या गोंडस मुलीला जन्म दिला. कन्येच्या आगमानाने कपूर कुटुंबियांतही आनंदाचे वातावरण आहे. आलिया भट्ट आता एका मुलीची आई असली तरी तिने चित्रपटसृष्टी सोडली नाही. तिच्याकडे बॉलिवूडचं नव्हे तर हॉलीवूडच्या चित्रपटात ती झळकणार आहे. मात्र आलियाच्याबाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे.

बॉलिवूड, हॉलिवूडनंतर आता आलिया भट्टला आता जपानी चित्रपटात काम करायचे आहे. मॅरी क्लेअरशी नुकत्याच झालेल्या संवादामध्ये तिने हा खुलासा केला आहे. तीच असं म्हणणं आहे की तिला आता जागतिक चित्रपटांमध्ये काम करायचे आहे जेणेकरून तिचा अभिनय आणखीन समृद्ध होईल. म्हणूनच तिला हॉलिवूडनंतर आता जपानी चित्रपटात काम करायचे आहे.

“मला फरक पडत नाही मी कोण….” मानसी नाईकच्या पतीची पोस्ट चर्चेत!

आलिया भट्ट पुढे म्हणाली “मला स्वतःला एका साच्यात ठेवायचे नाही. मला जेवढं शक्य आहे तितकं मी एक्स्प्लोर करणार आहे. केवळ हॉलिवुड चित्रपटात काम करणे अथवा जो येईल कुठून ही आलेला आशयात मला काम करायचे नाही. स्वतःला सतत आव्हान देत राहणे आणि अस्वस्थ करणाऱ्या भूमिका साकारात राहणे अशी माझी कल्पना आहे. जर मला भाषा कशी बोलायची हे कळल्यास मी पहिला चित्रपट जपानी भाषेतला करेन. मला स्वतःला कंटाळा येऊन नये म्हणून मी स्वतःला सतत प्रेरित करत असते.”

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्ट नुकतीच आपल्या पतीबरोबर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात तिने काम केले होते. आलियाने काही वर्षातच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आलियाने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘हम्प्टी शर्मा की दुलहनिया’, ‘कपूर अँड सन्स, गंगुबाई’ यांसारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट तिने केले आहेत. आलिया आता झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे तर हॉलिवूडच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटात ती काम करणार आहे.