ऐश्वर्या राय ही महानायक अमिताभ बच्चन यांची सून आहे. पण ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न करण्याआधी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं होतं. ‘मोहब्बतें’ आणि ‘खाकी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. तेव्हाचाच एक प्रसंग आहे. ऐश्वर्याचा अपघात डोळ्यांनी पाहिल्यावर अमिताभ बच्चन दोन रात्री झोपू शकले नव्हते.

‘खाकी’ सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या अपघातात जखमी झाली होती. तिचा डोळ्यांसमोर अपघात झालेला पाहून बिग बी खूप चिंतेत होते आणि दोन रात्री झोपू शकले नव्हते. एक स्टंट मॅन वेगाने गाडी चालवत होता, त्याचे नियंत्रण सुटले आणि कार ऐश्वर्याच्या खुर्चीवर आदळली होती. यामुळे ऐश्वर्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

प्रसिद्ध अभिनेत्री ४३ व्या वर्षी करतेय चौथं लग्न; बॉयफ्रेंडला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, आधीचे तीन पती कोण?

ऐश्वर्याच्या अपघाताबद्दल काय म्हणाले होते बिग बी?

एका जुन्या मुलाखतीत बिग बी या अपघाताबद्दल बोलले होते. हा अपघात पाहून ते खूप व्यथित झाले होते, असं त्यांनी म्हटलं होतं. “मी ऐश्वर्याच्या आईला विचारलं की त्यांना आपल्या मुलीला मुंबईला घेऊन जायचं आहे का? आम्ही त्यासाठी अनिल अंबानींच्या खासगी विमानाची सोय केली होती. नाशिकमध्ये नाईट लँडिंगची सोय नसल्याने, आम्हाला दिल्लीहून मिलिट्री बेसवर विमान लँडिंग करण्याची परवानगी घ्यावी लागली होती. ही जागा हॉस्पिटलपासून पाऊण तासांच्या अंतरावर होती. विमानातील सीट्स काढून टाकल्या होत्या. मात्र बरेच लोक हा लहानसा अपघात आहे, असं म्हणत होते,” असं त्यांनी सांगितलं होतं.

amitabh bachchan family
अमिताभ बच्चन कुटुंबासमवेत (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला झालेल्या दुखापतीचं गांभीर्य सांगितलं होतं. “दोन रात्री मी झोपू शकलो नव्हतो. हे माझ्या डोळ्यांसमोर घडलं होतं. तिच्या पाठीवर गंभीर जखमा होत्या. तिच्या पायाचं हाड मोडलं होतं. तिला गंभीर दुखापत झाली होती, पण लोकांनी ही लहानशी घटना असल्याचं म्हटलं होतं,” असं अमिताभ म्हणाले होते.

एक्स बॉयफ्रेंडचे फोटो जाळले, बॉलीवूड अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर ‘असा’ काढला राग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘खाकी’ चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला होता आणि त्यात बिग बी, ऐश्वर्या राय, अक्षय कुमार, अजय देवगण, तुषार कपूर यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाच्या रिलीजनंतर तीन वर्षांनी ऐश्वर्या रायचं अभिषेक बच्चनचं लग्न झालं आणि ती अमिताभ बच्चन यांची सून झाली. या जोडप्याच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत.