scorecardresearch

‘भोला’मधील सहा मिनिटांच्या ‘त्या’ ॲक्शन सीनमागे आहे तीन महिन्यांची मेहनत; अजय देवगणने शेअर केला खास व्हिडीओ

या सीनमध्ये अजय देवगण अत्यंत थरारक असे स्टंट करताना दिसत आहे

bhola action scene BTS
फोटो : व्हिडिओतून स्क्रीनशॉट

अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजयचा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझरप्रमाणेच ट्रेलरलाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

जवळपास २ मिनिटं ३३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अजय व तब्बूचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. अ‍ॅक्शन सीन्स, क्राइम थ्रीलर असा हा चित्रपट असल्याचं ट्रेलरमधून दिसून येत आहे. या सगळ्यात एक मोटरसायकल आणि ट्रक यांच्यातील पाठलाग दृश्याची चांगलीच चर्चा होत आहे. या सीनमध्ये अजय देवगण अत्यंत थरारक असे स्टंट करताना दिसत आहे, शिवाय याला अॅक्शनची फोडणीही दिली गेली आहे. नुकतंच अजय देवगणने या सीनच्या मागची गोष्ट उलगडली आहे.

आणखी वाचा : किंग खानचा ‘पठाण’ घालतोय ओटीटीवर धुमाकूळ; डिलीट केलेले ‘हे’ सीन्स पाहून नेटकरी म्हणाले…

अजयने एक व्हिडिओ शेअर करत या सीनविषयी खास माहिती दिली आहे. हा चेस सिक्वेन्स तब्बल ६ मिनिटांचा आहे असा अजयने खुलासा केला आहे. शिवाय याच्या चित्रीकरणासाठी तब्बल ११ दिवस लागल्याचंही स्पष्ट झालं आहे. यासाठी संपूर्ण चित्रपटाच्या टीमने ३ महीने मेहनत घेतल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे. याबरोबरच यातील सगळे अॅक्शन सीन्स हे अजय देवगणने आपले वडील विरू देवगण यांना समर्पित केले आहेत.

अजय देवगणने एक खास व्हिडीओ शेअर करत या सिनचे कॅमेराच्या मागचे काही क्षण चित्रित केले आहेत. आजवरच्या हिंदी चित्रपटात एवढा धाडसी अॅक्शन सीन आजवर झाला नसल्याचा दावाही या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. अजयचा हा ‘भोला’ तामीळ चित्रपट ‘कैथी’चा अधिकृत रिमेक आहे ज्याचं दिग्दर्शन लोकेश कनकराजने केलं होतं. ‘भोला’मध्ये अजय देवगण आणि तब्बूसह मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल, गजराज राव कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ३० मार्च रोजी चित्रपटगृहात धडकणार असून प्रेक्षकांना हा चित्रपट ३डी मध्येदेखील पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 16:03 IST

संबंधित बातम्या