रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ अर्थात सिंघमच्या तिसऱ्या भागाची सध्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु, अद्याप या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण न झाल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता चित्रपटाची नवीन रिलीज डेट लवकरच जाहीर करण्यात येईल. समोर आलेल्या माहितीनुसार आता २०२४ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

बॉलीवूड हंगामाच्या सूत्रांनी दिलेल्या माहिनीनुसार, रोहित शेट्टी आणि अजय देवगण सध्या सिंघम चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. १५ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असं याआधी रोहित शेट्टीने जाहीर केलं होतं. परंतु, सध्या चित्रपटाच्या शूटिंगला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित आणि अजयला ठरलेल्या तारखेलाच चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी कोणतीही घाई करायची नाही. कोणतीही तडजोड न करता शूटिंग व्यवस्थित व्हावं अशी त्यांची इच्छा आहे.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Nilesh sable said chala hawa yeu dya will come back soon dvr
‘चला हवा येऊ द्या’ येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला? निलेश साबळे खुलासा करत म्हणाला, “त्या टीममध्ये सागर कारंडे…”
OTT this week release
‘हीरामंडी’ व ‘शैतान’नंतर या आठवड्यात OTT वर येणार ‘हे’ जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वाचा यादी
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
akshay kumar bade miyan chote miyan movie and ajay devgn maidaan movie box office collection
अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने अवघ्या चार दिवसांत कमावले ‘एवढे’ कोटी, तर अजय देवगणच्या ‘मैदान’ची कमाई फक्त…

हेही वाचा : स्वप्नपूर्ती! रुचिरा जाधवने घेतलं नवीन घर, दारावरच्या पाटीवर लावलं आई-बाबांचं नाव, फोटो शेअर करत म्हणाली…

सध्या या चित्रपटाची टीम दिवाळी २०२४ मध्ये ‘सिंघम अगेन’ रिलीज करण्याचा विचार करत आहे. यामध्ये रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान हे सेलिब्रिटी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय अर्जून कपूर चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तारखेत बदल केल्यामुळे रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा बॉक्स ऑफिस क्लॅश टळणार आहे.

हेही वाचा : ‘हे मन बावरे’ फेम शशांक केतकर व मृणाल दुसानिस पुन्हा झळकणार एकत्र? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

‘पुष्पा २’ आणि ‘सिंघम अगेन’ या दोन्ही चित्रपटांती रिलीज डेट १५ ऑगस्ट जाहीर केल्याने बॉक्स ऑफिसवर नेमकं कोण बाजी मारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु, निर्मात्यांनी ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने आता दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची बॉक्स ऑफिस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल.