बॉलिवूड अभिनेता अजय देवगण गेल्या तीन दशकांपासून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अजयच्या चित्रपटांची लोक आतुरतेने वाट पाहतात. तशीच त्याच्या बहुप्रतिक्षित ‘मैदान’ या चित्रपटाचीही गेली कित्येक वर्षं चर्चा आहे. गेली काही वर्षं अजयच्या आगामी ‘मैदान’ची लोक फार आतुरतेने वाट बघत आहेत परंतु प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने निर्माते त्याची प्रदर्शानाची तारीख पुढे ढकलताना दिसत आहेत.

मध्यंतरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत मोठी अपडेट समोर आली होती. २०२४ च्या ईदला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता हे वृत्त समोर आलं होतं. इतकंच नव्हे तर हा चित्रपट अक्षय कुमार व टायगर श्रॉफच्या ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्याबरोबरीनेच प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर झालं. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल नवी माहिती समोर आली आहे.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
randeep-hooda-savarkar3
“मी माझं घर विकून…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य
chat with terav marathi movie team members
‘तेरवं’ : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची संघर्ष कथा

आणखी वाचा : ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित; नक्षलवादाशी दोन हात करताना दिसणार अदा शर्मा

निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा ट्रेलर हा ७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. यासाठी एक भव्य ट्रेलर लॉंच सोहळादेखील आयोजित करण्यात आला आहे. याच्या पुढच्याच दिवशी अजय देवगणचाच ‘शैतान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे ‘मैदान’चा ट्रेलर हा ८ मार्चपासून चित्रपटगृहात ‘शैतान’बरोबरच दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी ‘मैदान’चे निर्माते बोनी कपूर यांनी या चित्रपटाचा एक खास स्क्रीनिंग आयोजित केलं होतं ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

अजय देवगणचा हा चित्रपट एक बायोग्राफीकल स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली असून गेली कित्येक वर्षं ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मागे लागले आहेत. हा चित्रपट लांबणीवर पडल्याने बोनी कपूर यांनादेखील प्रचंड नुकसान झाल्याचं मध्यंतरी त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. ‘मैदान’मध्ये अजय देवगणसह प्रियामणी, नितांशी गोयल, अमीर अली शेख, आर्यन भौमिक, अमर्त्य रे, मधुर मित्तल असे बरेच कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.