Bastar The Naxal Story Trailer: विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन व अदा शर्मा हे तिघे पुन्हा एकदा एकत्र आणखी एक धाडसी विषयावर बेतलेला चित्रपट लवकरच घेऊन आपल्यासमोर येणार आहेत. ‘द केरला स्टोरी’नंतर लगेचच काही दिवसात सुदीप्तो सेन यांनी आगामी ‘बस्तर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची पोस्टर्स अदा शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती. त्यानंतर अदाने याचा पहिला टीझरही शेअर केला होता.

आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अदा शर्मा आयपीएस अधिकारी नीरजा माधवन हीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहताना अंगावर रोमांच उभा रहात आहे. या चित्रपटाची कथा ७६ सीआरपीएफ जवानांच्या शहीद होण्यावर अन् त्यातून होणाऱ्या सुडकथेवर भाष्य करणारा आहे. चित्रपटात डाव्या विचारणीवर तसेच नक्षलवादावर परखडपणे भाष्य करण्यात आल्याच ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

आणखी वाचा : तब्बल १६ वर्षांनी आमिर खान व दर्शिल सफारी येणार एकत्र? ‘त्या’ सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेला उधाण

याबरोबरच नक्षली लोकांची क्रूरता, ‘बस्तर’सारख्या छोट्याश्या गावात त्यांनी पसरवलेली दहशत, सरकारी यंत्रणा तसेच राजकीय नेत्यांची या प्रकरणाबाबतची उदासीनता अन् आयपीएस अधिकारी नीरजा माधवन यांनी नक्षल्यांचा खात्मा करायचा उचललेला विडा अशा वेगवेगळ्या गोष्टी फार निराळ्या पद्धतीने चित्रपटात उलगडणार आहे हे या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच या चित्रपटातही प्रचंड हिंसाचार पाहायला मिळणार आहे.

डाव्या वामपंथी लोकांची अन् त्यांच्या छुप्या अजेंड्याची पोलखोल या चित्रपटातून करण्यात येणार आहे असा दावाही याच्या निर्मात्यांनी या ट्रेलरमधून केला आहे. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनीच केले आहे अन् विपुल शाह यांनी त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे अन् याबरोबरच इंदिरा तिवारीही एका खास भूमिकेत झळकणार आहे. १५ मार्च मध्ये हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.