scorecardresearch

अक्षय कुमार व जॉन अब्राहम ही जोडी पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार? ‘या’ चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा

अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत

desi boyz sequel
फोटो : सोशल मिडिया

सध्या बॉलिवूडमध्ये वेगळं किंवा हटके विषयांपेक्षा रिमेक आणि सीक्वलचा फॉर्म्युला आपल्याला बघायला मिळत आहे. बऱ्याच हीट चित्रपटांचे भाग २ जाहीर करण्यात आले आहेत तर काही सीक्वल्सवर काम सुरू आहे. असाच एक धमाल चित्रपटाचा दूसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैया २’चे निर्माते आनंद पंडित यांनी अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या ‘देसी बॉइज’ या चित्रपटाचा दूसरा भाग येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

२०११ साली प्रदर्शित झालेला ‘देसी बॉइज’ हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५३ कोटी इतकी कमाई केली होती. चित्रपटाने फारशी चांगली कामगिरी केली नसली तरी याचा सीक्वल येणार असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती. नुकतंच निर्माते आनंद पंडित याची पुष्टीदेखील केली आहे.

आणखी वाचा : ‘संत तुकाराम’ चित्रपटातील सुबोध भावेच्या लूकची चर्चा; जितेंद्र जोशी कमेंट करत म्हणाला…

‘टेली चक्कर’ या ऑनलाईन पोर्टलशी संवाद साधताना आनंद पंडित यांनी अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांना एकत्र आणायची इच्छा व्यक्त केली. याविषयी बोलताना ते म्हणाले, “मी याआधीही म्हंटलं आहे की माझ्यासाठी स्क्रिप्ट फार महत्त्वाची आहे, आणि जेव्हा स्क्रिप्ट आम्हाला पटेल तेव्हाच आम्ही या चित्रपटातील कलाकारांचा विचार करू शकतो. या नव्या भागात तीच जोडी तुम्हाला दिसेल की नाही याबाबत मी साशंक आहे कारण हा चित्रपट मला आजच्या तरूणांसाठी बनवायचा आहे.”

अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. याविषयी आनंद पंडित यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. ‘देसी बॉइज’चं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांचा मुलगा रोहित धवन याने केलं होतं. जॉन आणि अक्षयसह या चित्रपटात दीपिका पदूकोण, चित्रांगदा सिंग या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. ‘देसी बॉइज २’ बरोबरच ‘द बिग बुल २’, ‘सरकार ४’ या चित्रपटांवरही आनंद पंडित काम करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 17:16 IST