scorecardresearch

Premium

हातात मशीन गन्स अन् हेलिकॉप्टरमधून उडी मारत ‘सूर्यवंशी’ची एंट्री; ‘सिंघम अगेन’मधील अक्षय कुमारचा लूक चर्चेत

दीपिका पदूकोण आणि टायगर श्रॉफसुद्धा या कॉप युनिव्हर्समध्ये सामील होणार आहेत. तर या चित्रपटात अर्जुन कपूर नकारात्मक भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे

singham-again-akshay-kumar-looj
फोटो : सोशल मीडिया

अक्षय कुमार सध्या रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांच्या या उत्सुकतेमध्ये अक्षय कुमारने आता आणखी भर घातली आहे. नुकतंच शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मधील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक लोकांसमोर आला आहे. अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केलं आहे जे पाहून चित्रपटप्रेमी चांगलेच उत्सुक झाले आहेत.

या पोस्टरमध्ये अक्षय दोन्ही हातात मशीनगन घेऊन हेलिकॉप्टरमधून उडी मारताना दिसत आहे. अक्षयची ही जबरदस्त स्टाईल लोकांना जाम भावली आहे. इतकंच नव्हे तर कतरिना कैफ आणि अजय देवगणनेही यावर कॉमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय कुमार सिंघममध्ये पुन्हा एटीएस प्रमुख वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच ‘सिम्बा’च्या भूमिकेत रणवीर सिंगसुद्धा यात दिसणार आहे.

amitabh-bachchan2
“प्रादेशिक चित्रपट उत्तम पण…” हिंदी चित्रपटसृष्टीची बाजू घेत अमिताभ बच्चन यांनी केली प्रेक्षकांची कानउघडणी
Loksatta lokrang Popular actor Piyush Mishra on the stage of Loksatta Gappa
अभिनय ही गांभीर्यानं करण्याची बाब!
Marathi Actress Sonalee Kulkarni malaikottai vaaliban malayalam movie Mohanlal Lijo Jose Pellissery marathi film industry
मराठमोळ्या अभिनेत्रीचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, अनुभव सांगत म्हणाली, “मराठी व मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर…”
hrithik-roshan-anil-kapoor
“गेली चार दशकं…” ‘फायटर’च्या प्रमोशनदरम्यान हृतिकचे वक्तव्य ऐकताच अनिल कपूर यांना अश्रु अनावर

आणखी वाचा : ‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात; सकाळी लवकरच्या शोबद्दल नवी माहिती समोर

या दोघांव्यतिरिक्त दीपिका पदूकोण आणि टायगर श्रॉफसुद्धा या कॉप युनिव्हर्समध्ये सामील होणार आहेत. तर या चित्रपटात अर्जुन कपूर नकारात्मक भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे. अद्याप याबद्दल कोणताही खुलासा झालेला नाही. परंतु अक्षय कुमारचा हा जबरदस्त धासु अंदाज प्रेक्षकांना भारीच आवडला आहे. या मेगा बजेट चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पहात आहेत.

‘सिंघम अगेन’ची कथा रामायणावर बेतलेली असू शकते अशी चर्चाही होताना दिसत आहे. ‘सिंघम अगेन’चं चित्रीकरण सुरू झालं असून मुंबईचा यश राज स्टुडिओ आणि हैद्राबादमधील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तसेच आता लवकरच या चित्रपटाचा जबरदस्त क्लायमॅक्स चित्रित होणार आहे ज्यावर तब्बल २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘सिंघम अगेन’ प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’सुद्धा येणार आहे. अद्याप कोणत्याही निर्मात्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबद्दल भाष्य केलेलं नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar as sooryavanshi first look from upcoming singham again avn

First published on: 05-11-2023 at 14:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×