अक्षय कुमारच्या आगामी ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेले काही दिवस हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला. तर यापाठोपाठ सेन्सॉर बोर्डाने देखील या चित्रपटातील काही दृश्यांवर कात्री लावली. अशातच आता या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे.

काल अक्षय कुमारने चाहत्यांना मोठे सरप्राईज दिलं. या चित्रपटातील ‘हर हर महादेव’ हे गाणं काल रिलीज झालं. विशेष म्हणजे या गाण्यामध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या वेशभूषेत तांडव नृत्य करताना दिसत आहे.

आणखी वाचा : “पैसा यांना काय काय करायला लावतो…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे सलमान खान व अक्षय कुमार ट्रोल

हे गाणं समोर येताच प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्यातील सरप्राईज एलिमेंट म्हणजे अक्षय कुमारचं तांडव नृत्य आहे. वयाच्या ५५व्या वर्षी त्याला हा नृत्यप्रकार करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या गाण्यावर संमिश्र प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. अनेकांनी या गाण्यातील अक्षय कुमारच्या डान्सचं कौतुक केलं.

हेही वाचा : Video: “२३-२४ वर्षांच्या मुलींबरोबर…” मौनी रॉय व सोनम बाजवाबरोबर शर्टलेस होऊन नाचल्याने अक्षय कुमारवर संतापले नेटकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गाण्याला चांगला प्रतिसाद जरी मिळत असला तरीही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटातील दृश्यांवर सेन्सर बोर्डाने सुचवलेल्या कट्सनंतर निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्वजण या चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाच्या तारखेची वाट बघत आहेत.