scorecardresearch

“पैसा यांना काय काय करायला लावतो…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे सलमान खान व अक्षय कुमार ट्रोल

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या पब्लिक अ‍ॅपिअरन्समुळे चर्चेत असतात. आता अक्षय कुमार आणि सलमान खान यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

salman akshay

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या पब्लिक अ‍ॅपिअरन्समुळे चर्चेत असतात. अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत असतात. ते तिथे फक्त हजेरीच लावत नाहीत तर त्यांचे कलागुण देखील दाखवतात. आता अक्षय कुमार आणि सलमान खान यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सलमान खान आणि अक्षय कुमार यांनी नुकत्याच एका शाही लग्न सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी या दोघांनी एक धमाकेदार परफॉर्मन्सही दिला. पण त्यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून त्यामुळे ती दोघं चांगलेच ट्रोल होत आहेत.

आणखी वाचा : लोकांना मदत करण्यासाठी इतके पैसे कुठून आणतोस? अखेर सोनू सूदने उघड केलं गुपित, म्हणाला…

व्हायरल होत असलेल्या शाही लग्न सोहळ्याच्या या व्हिडीओमध्ये सलमान खान ने काळ्या रंगाचा शर्ट पॅन्ट परिधान केली होती. तर अक्षय कुमारने मल्टी कलर झब्बा आणि त्याखाली काळ्या रंगाची सलवार परिधान केली होती. यावेळी सलमान खान ‘मुन्ना बदनाम हुआ’ या गाण्यावर तर अक्षय ‘मैं खिलाड़ी तू अनाडी’ या गाण्यावर बॅकग्राऊंड डान्सर्सबरोबर थिरकला. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा : डिंपल कपाडिया यांनी अक्षय कुमारला घातली होती ट्विंकलबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्याची अट, कारण…

हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. यावर कमेंट करत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हे लग्न नक्की कोणाचं आहे ज्याच्यात सलमान आणि अक्षय नाचत आहेत!” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “यांच्यावर ही वेळ आली की लग्नातही नाचतील.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “पैसा यांना काय काय करायला लावतो!” त्यामुळे सलमान आणि अक्षय आता या लग्नामुळे चर्चेत आले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 19:56 IST