अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ यंदाच्या दिवाळीनिमित्त प्रदर्शित झाला. ‘राम सेतु’ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उत्तम कामगिरी केली. पण त्यानंतर या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ‘राम सेतु’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा घसरतच गेला. आता चित्रपट प्रदर्शित होऊन आठ दिवसच झाले आहेत. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करू शकला नाही.

आणखी वाचा – अवघ्या विशीत दोनवेळा कर्करोगाशी झुंज अन् आता ब्रेन स्ट्रोकचा सामना करतेय प्रसिद्ध अभिनेत्री, रुग्णालयात उपचार सुरु

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा

प्रदर्शनापूर्वीच अक्षयचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे ‘राम सेतु’ला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं. ‘राम सेतु’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ११ कोटी ४० लाख रुपये तर तिसऱ्या दिवशी ८ कोटी ७५ लाख रुपये कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने ६ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. त्यानंतर ही आकडेवारी आणखीनच घसरत गेली.

प्रदर्शनाच्या ९व्या दिवशी चित्रपटाने फक्त २ कोटी २० लाख रुपये कमाई केली आहे. आता पर्यंत या चित्रपटाने फक्त ६४ लाख रुपये इतपतच बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला. जवळपास ३ हजार स्क्रिनवर प्रदर्शित झालेला अक्षयचा ‘राम सेतु’ पुरता अयशस्वी ठरला आहे.

आणखी वाचा – Inside Photos : कधीकाळी अगदी लहान घरामध्ये राहणाऱ्या आदेश बांदेकर यांचं आलिशान घर आहे फारच सुंदर, पाहा फोटो

‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ असे त्याचे चित्रपट एकापाठोपाठ एक सुपरफ्लॉप ठरले आहेत. आता त्याने आपला मोर्चा मराठी चित्रपटाकडे वळवला आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे येणाऱ्या काळातच समजू शकेल.