बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार अनेकदा त्याच्या पत्नीची प्रशंसा करताना दिसतो. अनेक मुलाखतींमध्ये ट्विंकल खन्नाबद्दल तो भरभरून बोलला आहे. ट्विंकलने नुकतीच लंडन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. या वयातही तिचा आयुष्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून अक्षयला अनेकदा आश्चर्य वाटतं.

नुकतीच अक्षयनं जिओ सिनेमावरील ‘धवन करेंगे’ या टॉक शोला मुलाखत दिली. यादरम्यान त्यानं शिखर धवनशी गप्पा मारल्या. अक्षय या मुलाखतीत पत्नी ट्विंकलबद्दल खूप कौतुकानं बोलला. या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “माझ्या मुलीला ट्विंकलकडून बुद्धिमत्ता मिळते. मी तर एक अशिक्षित माणूस आहे. जास्त शिकलोही नाही. मी गाढवाच्या मजुरीसारखी कामं करतो आणि ती डोकं चालवून चलाखीनं काम करते.”

हेही वाचा… “पाय दुखायला लागले पण…”, पहिल्याच हिंदी सिनेमात ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला मिळाली होती ‘अशी’ वागणूक; म्हणाले, “चिखलाच्या…”

अक्षय पुढे म्हणाला, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, मी राजेश खन्ना यांच्या मुलीशी लग्न केलं. पण, त्याहूनही मी जास्त भाग्यवान आहे; कारण ती एक चांगली पत्नी आणि चांगली आईदेखील आहे. जर तुम्हाला जीवनात योग्य जोडीदार मिळाला, तर तुमचं आयुष्य परिपूर्ण होतं. मी माझ्या कामामध्ये व्यग्र असायचो तेव्हा तिनं आमच्या मुलांची खूप चांगली काळजी घेतलीय. माझी पत्नी आजही तिच्या जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोणातून पाहते याचं खरंच मला आश्चर्य वाटतं.”

“ती ५० वर्षांची आहे आणि अजूनही ती शिकायला जाते. तिनं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे आणि आता ती पीएच.डी. करीत आहे. जेव्हा मी लंडनला जातो तेव्हा मी माझ्या मुलीला शाळेत सोडतो, माझ्या मुलाला विद्यापीठात सोडतो आणि शेवटी माझ्या पत्नीला विद्यापीठात सोडतो. आणि मग एखाद्या ‘अशिक्षित’ माणसाप्रमाणे घरी जातो आणि दिवसभर क्रिकेट बघत बसतो,” असंही अक्षय म्हणाला.

हेही वाचा… VIDEO: नताशा दलालच्या बेबी बंपने वेधलं चाहत्यांचं लक्ष; मतदान केंद्रावर एकटीला पाहून नेटकरी म्हणाले, “अशा अवस्थेत वरुण…”

अक्षय मजेशीररीत्या म्हणाला की, कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करण्याची इच्छा असूनही तो ते करू शकत नाही. कारण- तो पुस्तकं बघूनच रडायला लागतो. लहानपणी अक्षयला फक्त खेळामध्ये आवड होती. त्याबद्दल सांगताना तो म्हणाला, “माझ्या पालकांना कळलं होतं की, मी अभ्यासात अगदी शून्य आहे आणि म्हणून त्यांनी मला क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी पाठिंबा दिला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १० एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात अक्षय झळकला होता.