Alia Bhatt & Ranbir Kapoor Will Move Into Their New House : सामान्य माणूस असो किंवा कलाकार आपलं हक्काचं घरं असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशातच आता अशाच एका बॉलीवूडमधील कपलचं स्वप्न पूर्ण झालं आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर या जोडीच्या आलिशान बंगल्याचं काम आता पूर्ण झालं आहे.

आलिया व रणबीर ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी १४ एप्रिल २०२२ रोजी एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर या दोघांच्या गोंडस मुलीचा जन्म झाला. अशातच आता या जोडीचं एक स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार आलिया व रणबीर यांच्या कृष्णाराज या आलिशान बंगल्याचं बांधकाम पूर्ण झालं असून, लवकरच ते गृहप्रवेश करणार आहेत.

रणबीर व आलिया यांचं हे आलिशान घर मुंबईतील वांद्रे परिसरात आहे आणि त्या घराची किंमत तब्बल २५० कोटी इतकी आहे. या घराची नोंदणी त्यांची लेक राहाच्या नावावर त्यांनी केली होती. अशातच आता घराचं काम पूर्ण झालं आहे आणि आलिया व रणबीर या घरामध्ये राहायला जाणार असून, लवकरच ही जोडी येथे गृहप्रवेश करणार आहे.

आलिया भट्टने नुकतीच तिच्या सासू अभिनेत्री नितू सिंह यांच्यासह या घराला भेट दिली. आलिया व रणबीर यांच्या आलिशान बंगल्याचं कृष्णाराज, असं नाव आहे. हे नाव रणबीरचे आजोबा दिवंगत अभिनेते राज कपूर व आजी कृष्णा कपूर यांच्या नावांचा मिलाफ करून देण्यात आलं आहे.

रणबीर कपूरच्या या घराची किंमत अभिनेता शाहरुख खान अमिताभ बच्चन यांच्या आलिशान घरांपेक्षाही जास्त आहे. रणबीरच्या कृष्णराज या आलिशान बंगल्याची किंमत २५० कोटी इतकी असून, शाहरुख खानच्या घराची किंमत २०० कोटी इतकी आहे; तर अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याची किंमत १२० कोटी इतकी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया व रणबीर यांचा हा बंगला सहा मजली आहे आणि त्यातील प्रत्येक मजल्यावर छोटी छोटी झाडं असल्याचे पाहायला मिळत आहे. तर बंगल्याच्या गच्चीवर गार्डनही आहे. त्याशिवाय या बंगल्याला मोठी बाल्कनी असल्याचंही दिसतं. त्यांचा हा बंगला आता राहण्यासाठी तयार झाला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या या बंगल्याबद्दल चर्चा सुरू होती. आता ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात नवीन घरात ही जोडी त्यांच्या टीमसाठी डिनरचं आयोजनही करणार आहे.