आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अभिनेत्रीने काही दिवसांतच गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. पुढे, ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियाने राहाला जन्म दिला. सध्या रणबीर-आलियाची लाडकी लेक राहा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे.

गेल्यावर्षी ख्रिसमिसच्या निमित्ताने रणबीर-आलियाने राहाला माध्यमांसमोर आणलं. आता राहा दीड वर्षांची झाली आहे. अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सुद्धा सर्वत्र आलियाच्या लेकीची चर्चा रंगली होती. परंतु, तुम्हाला माहितीये का, लाडक्या लेकीच्या जन्मावेळी अभिनेत्रीला एक खास बंगाली पदार्थ खायची सारखी इच्छा व्हायची. आलियाच्या आहारतज्ज्ञांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video : साखरपुडा, हळद ते साता जन्माचे सोबती! प्रथमेश परबने शेअर केला लग्नाचा खास व्हिडीओ, नाव दिलंय खूपच खास

सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ सुमन अग्रवाल यांनी नुकत्याच त्यांच्या एका पॉडकास्टमध्ये आलिया भट्टला गरोदरपणात बंगाली गोड पदार्थ खायला खूप आवडायचा असं सांगितलं. अग्रवाल म्हणाल्या, “गरोदरपणात आलियाने मला अनेकवेळा फोन करून कोलकाता येथील ‘नोलेन गुड संदेश’ (Nolen Gur Sandesh) हा पदार्थ मागवून घेतला आहे. तिला तो पदार्थ खूप आवडायचा. भारतीय मिठाई आणि त्यातील घटक गर्भवती मातांसाठी खूप फायदेशीर असतात.”

हेही वाचा : “करिअरसाठी पत्नीला सोडून देता…”, जेव्हा शाहरुख खानने सिनेसृष्टीतील अभिनेत्यांवर केलेली टीका; म्हणालेला, “एवढे मूर्ख…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २०२२ मध्ये राहाच्या जन्म झाल्यावर जवळपास दीड महिने पूर्णपणे आराम करून आलिया पुन्हा कामावर परतली. राहाच्या जन्मानंतर ४ महिन्यांतच तिने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील “तुम क्या मिले…” या गाण्याचं बर्फात चित्रीकरण केलं होतं.