Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चहूबाजूने चर्चा सुरू आहे. या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी हॉलीवूडपासून, बॉलीवूड, दाक्षिणात्य कलाकार उपस्थित राहिले आहेत. याशिवाय उद्योग जगतातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच रणबीर कपूर व आलिया भट्टची लेक राहा कपूरच्या क्यूट व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘इस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर गोंडस राहा कपूरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, आलिया भट्ट राहाला कडेवर बसवून अनंत अंबानींशी भेट करून देताना दिसत आहे. यावेळी मायलेकीने मॅचिंग कपडे घातलेले पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत पुन्हा एकदा राहाचा क्यूट अंदाज दिसत आहे. राहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुख खानचा ‘जय श्रीराम’ नारा, अभिनेता अंबानी कुटुंबातील ‘त्रिमुर्ती’बद्दल म्हणाला….

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आलिया ही एक आई आहे, यावर विश्वास बसत नाहीये. ती स्वतः एका बाळासारखी दिसते’, ‘अनंत अंबानी खूप चांगल्या मनाचे व्यक्ती आहेत’, ‘ही छोटी आलिया किती क्यूट आहे’, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यावर थिरकल्या बॉलीवूडच्या तारका, मनीष मल्होत्राने दिली साथ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचा आज शेवटचा दिवस आहे. आज ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ हा कार्यक्रम आहे. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम असून यात पाहुण्यांना जामनगर फिरवलं जाणार आहे. तर दुसरा कार्यक्रम भारतीय पेहरावात असणार आहे.