scorecardresearch

“जबरदस्तीने मांड्या दाखवून…”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे आलिया भट्ट झाली ट्रोल

‘झी सिने अवॉर्ड’च्या रेड कार्पेटवर केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे आलिया भट्ट झाली ट्रोल

Alia Bhatt, Alia Bhatt Zee Cine Awards, Alia Bhatt Hot photos, Alia Bhatt bold photos, Alia Bhatt age, Alia Bhatt instagram, Alia Bhatt troll, Alia Bhatt post pregnancy bold look, Alia Bhatt baby, Alia Bhatt adjusting dress, Alia Bhatt ranbir kapoor, Alia Bhatt risque outfits, Alia Bhatt exposing her body, Bollywood, Entertainment, आलिया भट्ट, आलिया भट्ट व्हायरल व्हिडीओ, आलिया भट्ट झी सिने अवॉर्ड
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणारा ‘झी सिने अवॉर्ड’ नुकताच पार पडला. यावेळी बॉलिवूडच्या सर्वच सेलिब्रेटींनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. एकापेक्षा एक दमदार लूक्समध्ये बॉलिवूड कलाकार या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होती. या कार्यक्रमातील अभिनेत्रींच्या रेड कार्पेट लूकपैकी अभिनेत्री आलिया भट्टचा लूक सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे आणि सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. पण यावेळी आलियाने अशी काही कृती केली ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

आलिया भट्टने या पुरस्कार सोहळ्यासाठी थाय-हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. आलियाचे या ड्रेसमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मोकळे केस, मोजकी ज्वेलरी आणि माफक मेकअप अशा लूकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहेच, पण यासोबतच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती या ड्रेसमधून स्वतःचे पाय फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा- ‘त्या’ घटनेनंतर आलिया भट्ट पहिल्यांदाच आली कॅमेऱ्यासमोर; नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्याला पोज देताना आलिया भट्ट वारंवार स्वतःचा ड्रेस बाजूला खेचताना आणि पायांवरून बाजूला करताना दिसत आहे. तिच्या याच कृतीवरून तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यावर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “जबरदस्तीने मांड्या दाखवून काय सिद्ध करायचं आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “आजकालच्या अभिनेत्रींनी फालतू ट्रेंड चालवला आहे. ड्रेसमधून आपल्या मांड्या दाखवण्याचा” तर आणखी एकाने “निर्लज्जपणाच्या सगळ्या मर्यादा हिने पार केल्या आहेत.” अशीही कमेंट केली आहे.

आणखी वाचा- “फॅशनच्या नादात लग्न…”, अवॉर्ड सोहळ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे कियारा आडवाणी ट्रोल

दरम्यान आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 11:48 IST