scorecardresearch

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं, नीतू कपूर यांनी नातीचं नाव ठेवलं…

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं नाव काहीसं हटके आहे.

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं, नीतू कपूर यांनी नातीचं नाव ठेवलं…
आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं नाव काहीसं हटके आहे.

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. आलिया-रणबीरला मुलगी झाल्यानंतर कपूर व भट्ट कुटुंबिय अगदी आनंदात आहेत. हे सेलिब्रिटी कपल आपल्या लेकीचं नाव काय ठेवणार याचीच सगळ्यांना उत्सुकता होती. आता आलियानेच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करत आपल्या लेकीचं नाव सांगितलं आहे. तसेच लेकीच्या नावाचा अर्थही तिने सांगितला.

आलिया-रणबीरच्या लाडक्या लेकीच्या नावाबाबत कपूर कुटुंबियांमध्ये चर्चा सुरू होती. अखेरीस आता नाव ठरलं आहे. आलियाने रणबीर व लेकीसह फोटो पोस्ट करत याबाबत सांगितलं. पण आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं आहे.

आलिया. रणबीर व त्यांच्या लेकीचा फोटो अगदी ब्लर आहे. तसेच लाल व निळ्या रंगाच्या एका जर्सीवर आलियाच्या लेकीचं नाव लिहिण्यात आलं आहे. सेलिब्रिटी कपलने आपल्या लेकीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. तसेच लेकीच्या नावाचा अर्थही आलियाने सांगितला.

आणखी वाचा – “कर्करोगाच्या उपचारासाठी पैसे हवे म्हणून…” वडिलांच्या निधनाच्या वर्षभरानंतर सायली संजीवने सांगितला ‘तो’ प्रसंग

“राहा या नावाचा (तिच्या आजीने निवडलेलं नाव) खूप सुंदर अर्थ आहेत. राहाचा अर्थ होतो दैवी मार्ग. स्वाहिलीमध्ये आनंद. संस्कृतमध्ये कुळ, बांगलामध्ये विश्रांती, आराम व अरेबिकमध्ये आनंद, स्वातंत्र्य असा राहा या नावाचा अर्थ होतो.” तसेच आमचं आयुष्य आताच सुरु झालं आहे असं वाटतं असंही आलियाने या पोस्टद्वारे म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या