अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा होती. आज अखेर एका कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Tu Jhoothi Main Makkaar Trailer : नव्या पिढीचे प्रेमाबद्दलचे विचार हटके पद्धतीने मांडणाऱ्या रणबीर – श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर प्रदर्शित

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाबरोबर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचची चर्चा होती. पण, निर्मात्यांनी दोन दिवस आधीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. बॉलिवूड सेलब्रिटी या ट्रेलरवर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेता रणबीर कपूरची पत्नी अभिनेत्री आलिया भट्टने या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे.

तिने चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केली आहे. ‘चित्रपट पाहण्यासाठी वाट बघू शकत नाही’, असं कॅप्शन आलियाने दिलंय.

aliaa bhatt insta
(फोटो – इन्स्टाग्रामवरून स्क्रीनशॉट)

दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे निर्माते असून याचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं आहे.