बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट गुरुवारी लंडनमध्ये चॅरिटी गाला होस्ट केला. अभिनेत्री त्याआधी विमानतळावर दिसली. यावेळी तिने चाहत्यांबरोबर सेल्फी काढले. याचबरोबर तिने पापाराझींना पोज दिल्यात इतक्यात गर्दीतून तिला मराठीत कुणीतरी आवाज दिला. त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आलिया विमानतळाच्या गेटकडे जाताना दिसते. त्यावळे एक पापाराझी म्हणाला, ‘वहिनी नमस्कार.’ हे ऐकताच आलियाने कॅमेऱ्याकडे पाहिले आणि हसली. गोड स्माइल दिल्यानंतर ती पुढे निघून गेली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आलियाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहे. काहींनी आलियाचं हास्य सुंदर आहे, असं म्हटलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. आलियाच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

हर्षदीप कौर, कॉमेडियन रोहन जोशी आणि कोरिओग्राफर उषा जे यांनी होप गालामध्ये परफॉर्म केलं. हा कार्यक्रम लंडनमधील मँडारिन ओरिएंटल हाइड पार्क इथं पार पडला. सलाम बॉम्बे या संस्थेला मदत करणे हे होप गालाचे उद्दिष्ट आहे, त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

एक सुपरहिट गाणं, सलमान खान-अक्षयसह केलं काम; फिटमुळे करिअरवर झाला परिणाम, अभिनेत्रीने १० वर्षांपूर्वी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकतंच तिने वेदांग रैनाबरोबर ‘जिगरा’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन वासन बाला करत आहेत. हा चित्रपट सप्टेंबर २०२४ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. आलिया करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये शेवटची दिसली होती. रणवीर सिंगचीही भूमिका असलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.