Alia Bhatt Recreates Iconic Look Of Rekha : रेखा यांच्या आयकॉनिक ‘उमराव जान’ चित्रपटाचं स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं. या कार्यक्रमाला अनेक बॉलीवूड कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आलिया भट्ट सुद्धा या शोच्या स्क्रिनिंगला उपस्थित राहिली होती.
आलियाच्या सुंदर गुलाबी साडीने रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी अभिनेत्रीने साडीच्या गुलाबी रंगाला मॅचिंग होणारी पर्स कॅरी केली होती. हटके कानातले अन् छोटीशी टिकली या संपूर्ण लूकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. पण, तुम्हाला माहितीये का अभिनेत्रीने हा लूक रेखा यांच्या जुन्या चित्रपटातून रिक्रिएट केला होता.
आलिया भट्टने ‘उमराव जान’ सिनेमाच्या स्क्रिनिंगला उपस्थिती लावून त्यांच्या ४४ वर्षांपूर्वीच्या चित्रपटातील लूक हुबेहूब रिक्रिएट केला होता. रेखा यांची मुख्य भूमिका असलेला ‘सिलसिला’ चित्रपट १९८१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील रेखा यांचा गुलाबी साडीतील लूक आलियासाठी डिझायनर रिया कपूरने रिक्रिएट केला होता. रियाने याबाबत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे.
रियाने ‘सिलसिला’ चित्रपटातील रेखा यांचा फोटो आणि आलियाचा ‘उमराव जान’ स्क्रिनिंगदरम्यानचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तसेच डाएट सब्याची पोस्ट सुद्धा रियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “रेखा यांच्या ‘सिलसिला’ चित्रपटातील विविध लूक्समुळे फॅशनचे विविध पैलू आपल्यासमोर आले. त्यांचा या सिनेमातील गुलाबी साडीतील लूक खूपच सुंदर होता. आज या खास दिवशी ‘सिलसिला’ चित्रपटातील हा खास लूक आलियाने रिक्रिएट केला आहे.”

‘सिलसिला’ चित्रपटांचं दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं होतं. अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.
याशिवाय ‘उमराव जान’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर राष्ट्रीय चित्रपट संग्रह (NFAI) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांनी या क्लासिक चित्रपटाचं पुनरुज्जीवन केलं आहे; जेणेकरून नवीन पिढीलाही हा सुंदर सिनेमा पाहता येईल. २७ जूनला हा सिनेमा सर्वत्र पुन्हा एकदा प्रदर्शित झाला आहे.