आलिया भट्ट ही तिच्या लग्नापासून चांगलीच चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच तिने ती आई होणार असल्याची बातमी तिने चाहत्यांशी शेअर केली. तर दोन महिन्यांपूर्वीच तिला कन्यारत्न प्राप्त झालं. आता काही महिने कामातून ब्रेक घेत ती पालकत्व एन्जॉय करताना दिसतेय. मुलीच्या जन्मानंतर तिच्या आयुष्यात काय काय बदललं हे तिने शेअर केलं आहे.

राहाच्या जन्मानंतर काही दिवसातच आलिया भट्टने तिचं रुटीन बदललं. आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी तिने योगा ही करायला सुरुवात केली. हे सगळं करत असताना ती मुलीकडेही तितकंच लक्ष देत आहे. राहाच्या येण्याने तिच्या आयुष्यात बरेच बदल झाल्यास तिने नुकतीच एक पोस्ट शेअर करत सांगितलं.

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. त्यात ती म्हणाली, “मातृत्वाने माझ्यात बरेच बदल घडवून आणले. माझं शरीर, माझे केस, माझे स्तन, माझी त्वचा, माझ्या प्रायोरिटीज आणि माझ्यातील भीती. माझं मन पाहू शकता…आता ते अधिक खंबीर आणि प्रेमळ झालं आहे.” आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा : “गरोदर होती ना…” लग्नातील व्हायरल फोटोवर खोचक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी केलं आलिया भट्टला ट्रोल

राहा नुकतीच दोन महिन्याची झाली. पण आलिया आणि रणबीर या दोघांनी तिचा चेहरा चाहत्यांसमोर न आणण्याचा निर्णय घेतला आहे. राहा दोन वर्षांची होईपर्यंत तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर होणार नाही याची ते काळजी घेत आहेत.