पुढील वर्ष हे सिनेरसिकांसाठी खास असणार आहे. कारण अनेक बहिप्रतीक्षित सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ‘पठान’, ‘जवान’, ‘टायगर ३’, ‘डंकी’, ‘पुष्पा २’ अशा अनेक सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पण आता एका गोष्टीत अल्लू अर्जुनने शाहरूख खान आणि सलमान खानलाही मागे टाकल्याचं समोर आलं आहे आहे. प्रदर्शनाच्या आधीच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ने शाहरुख आणि सलमानच्या या आगामी चित्रपटांना मागे टाकत एक मोठी कामगिरी केली आहे.

आणखी वाचा : नृत्याच्या सरावादरम्यान रुबिना दिलैकला गंभीर दुखापत, चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेला ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स मोडले. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या स्टाइलची बरीच चर्चा रंगली होती. त्याच्या पुष्पा स्टाइलने सगळ्यांनाच वेडं करून सोडलं होतं. त्याच्या चित्रपटातील “झुकेगा नही साला” हा डायलॉगही प्रचंड व्हायरल झाला होता. ओटीटीवर प्रदर्शित होऊनही बॉक्स ऑफिसवर लोकांनी या चित्रपटासाठी तोबा गर्दी केली. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहादचा अभिनय सगळंच लोकांना प्रचंड आवडलं आणि तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढील भागासाठी आस लावून बसले आहेत.

नुकतीच ‘पुष्पा २’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. पण हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक उत्सुक आहेत. पण ‘पुष्पा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Ormax Mediaने नुकतंच ‘मोस्ट अवेटेड मुव्ही’बद्दल एक सर्वेक्षण केलं. यात अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा पहिल्या क्रमांकावर असलेला चित्रपट ठरला आहे. याचाच अर्थ अल्लू अर्जुनच्या या सिनेमाची सर्वात जास्त प्रेक्षक वाट बघत आहेत.

‘पुष्पा २’ खालोखाल प्रेक्षक शाहरूख खानच्या ‘पठाण’ची वाट बघत आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर शाहरुखचा ‘जवान’ आणि पाचव्या स्थानावर शाहरुखचा डंकी हे दोन सिनेमे आहेत.

हेही वाचा : अखेर प्रतीक्षा संपली; ‘पुष्पा द रुल’च्या चित्रीकरणाला सुरुवात, फोटो शेअर करत रश्मिका म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी १७ डिसेंबरला ‘पुष्पा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसले. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. हा चित्रपट मूळतः तेलुगुमध्ये शूट करण्यात आला होता आणि नंतर तो हिंदीसह इतर भाषांमध्ये डब करण्यात आला होता. ‘पुष्पा’ ने जगभरात ३५० कोटींहून अधिक कलेक्शन केले. त्यापाठोपाठ ‘पुष्पा २’ चित्रपटाचे बजेट ४५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.