Anant Ambani And Radhika Merchant Wedding : अंबानींच्या घरच्या लग्न सोहळ्याला मुंबईतल्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला जान्हवी कपूर, शिखर पहारिया, आलिया भट्ट, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, सलमान खान, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, अनन्या पांडे, रणवीर सिंह यांसारख्या असंख्य बॉलीवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. अखेर तो दिवस आता उजाडला आहे. अनंत-राधिका सात फेरे घेऊन आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

अनंत राधिकाच्या लग्नसोहळ्यातील Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अनंत अंबानी लग्न मंडपात रॉय एन्ट्री घेत असताना त्याच्या आजूबाजूला सगळे बॉलीवूड सेलिब्रिटी डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्रा या लग्नासाठी खास परदेशातून भारतात आली आहे. लग्नात एन्ट्री घेतल्यावर प्रियांका व रणवीर सिंह यांनी “सपने में मिलती है कुड़ी मेरी…” या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यावेळी प्रियांकाचा पती निकने देखील रणवीरच्या जोडीने ठुमके लगावल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : अंबानींच्या लग्न सोहळ्याला पतीसह पोहोचली प्रियांका चोप्रा! फोटो काढताना निक जोनसने केलं असं काही…; सर्वत्र होतंय कौतुक

रणवीर सिंह या लग्नसोहळ्यात बेभान होऊन डान्स करत असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनिल कपूर व रणवीर यांनी एकत्र “वन टू का फोर माय नेम इस लखन…”, “मैं तो रास्ते से जा रहा था…” या बॉलीवूडच्या एव्हरग्रीन गाण्यांवर ठेका धरला होता. जान्हवी, शिखर, मानुषी, खुशी, सारा अली खान असे सगळेच स्टारकिड्स अंबानींच्या लग्नसोहळ्यात थिरकले आहेत. याचे व्हिडीओ विरल भय्यानी व मानव मंगलानी या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Video : नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर, नथ अन्…; अंबानींच्या लग्नसोहळ्यात देशमुखांच्या सुनेची चर्चा! रितेशसह घेतली एन्ट्री

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनंत- राधिकाच्या लग्नात सगळ्या सेलिब्रिटींना काशी शहराची थीम पाहायला मिळेल. याशिवाय नीता अंबानींनी काशीची संस्कृती जपण्यासाठी त्याठिकाणी असलेल्या प्रसिद्ध काशी चाट भांडारच्या टीमला मुलाच्या लग्नासाठी मुंबईत आमंत्रित केलं आहे. पालक चाट, आलू टिक्की, कुल्फी फालुदा असे विविध पदार्थ लग्नसोहळ्यात जेवणाच्या मेन्यूमध्ये असतील. हा लग्नसोहळा १२ जुलै ते १५ जुलै असे तीन दिवस पार पडणार आहे.