बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमीषा पटेल होय. ‘कहो ना प्यार है’ सारख्या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अमीषाने करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान मिळवणारी अमीषा नात्यांबद्दल फारशी नशीबवान राहिली नाही. तिची अफेअर्स प्रचंड गाजली. इतकंच नाही, तर त्या अफेअर्सची तिला करिअरमध्ये मोठी किंमत मोजावी लागली, ही बाब तिने स्वतः स्वीकारली होती.

लग्नासाठी कसा मुलगा हवा? माधुरी पवारने सांगितली अपेक्षांची यादी; म्हणाली, “त्याला मराठी यायला हवं आणि…”

अमिषा दिग्दर्शक विक्रम भट्टबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. विक्रम विवाहित होता, दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती. आता नुकतंच पुन्हा एकदा अमिषा पटेलने विक्रम भट्टसोबतच्या तिच्या अफेअरबद्दल भाष्य केलं. दोघांनी सार्वजनिकपणे अफेअरची कबुली दिल्याने त्याचे करिअरमध्ये नुकसान झाले, असंही अमीषा म्हणाली.

झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात गेलं बालपण, आताही भाड्याच्या घरात राहते माधुरी पवार; ‘ड्रीम होम’बद्दल म्हणाली, “मला कौलारू…”

अमीषा पटेल म्हणाली, “या इंडस्ट्रीत जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमचा प्रामाणिकपणा स्वीकारला जात नाही आणि मी खूप प्रामाणिक आहे, कारण माझ्यासाठी आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट आहे. तुम्ही माझ्याशी जसे वागाल तसंच मी तुमच्याशी वागेन. मी आयुष्यात ज्या गोष्टी घडतात, त्या स्वीकारते. पण मला वाटतं की हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमतरता आहे. ज्यामध्ये मी सार्वजनिकरित्या स्वीकारलेल्या त्या दोन नातेसंबंधांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नाती जाहीरपणे स्वीकारण्याचा माझ्या करिअरवर परिणाम झाला आणि नंतर १२-१३ वर्षे मी माझ्या आयुष्यात कोणालाही येऊ दिलं नाही. आता मला माझ्या आयुष्यात फक्त शांतता हवी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमीषा पटेल व विक्रम भट्ट पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याला अभिनेत्रीच्या घरून विरोध होता. या विरोधामुळेच तिचे पालकांशी वाद झाले आणि करिअरवरही परिणाम झाला. याशिवाय तिने कणव पुरीबरोबरच्या नात्याचीही कबुली दिली होती, पण नंतर दोघांचं ब्रेकअप झालं होतं. दरम्यान, लवकरच ‘गदर २’मधून अमीषा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.