बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेलने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिच्या क्रशबद्दल सांगितलं. तिला ज्या अभिनेत्यावर क्रश आहे, त्याच्याबरोबर वन नाइट स्टँड करू शकते, असं विधान तिने केलं होतं. तोच अभिनेता आता ६३ व्या वर्षी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अमीषा पटेलचा क्रश असलेला हा अभिनेता म्हणजे हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रूझ होय. ६३ वर्षांचा टॉम क्रुझ त्याच्या डेटिंग लाईफमुळे चर्चेत आहे. रडार ऑनलाइनच्या वृत्तानुसार, टॉम क्रूझ लवकरच हॉलीवूड अभिनेत्री अ‍ॅना डी आर्मास (Tom Cruise-Ana de Armas Wedding) हिच्याशी लग्न करणआर आहे. अद्याप टॉम किंवा अ‍ॅना यांनी लग्नाबाबत अधिकृत काहीच माहिती दिलेली नाही. अ‍ॅना डी आर्मास ३७ वर्षांची आहे. ती टॉमपेक्षा २६ वर्षांनी लहान आहे.

टॉम क्रूझ आणि अ‍ॅना डी आर्मास लग्न करणार आहेत. त्यांचं लग्न फिल्मी असण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, “दोघेही साहसी आहेत आणि त्यांना थरारक गोष्टी करायला आवडतात. ते एकत्र येण्याचं हेही एक काण आहे. त्या दोघांची आवड दर्शवेल अशा पद्धतीने ते लग्न करतील.” टॉम क्रूझला अंतराळ प्रवासाची आवड आहे आणि त्यामुळे तो अंतराळात लग्न करण्याचा विचारही करू शकतो. स्कायडायव्हिंग करताना हवेत लग्न करण्याचीही चर्चा रंगली आहे. “ते दोघे जे काही करतील ते सामान्यांपेक्षा खूप वेगळे असेल,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Tom Cruise-Ana de Armas Wedding
टॉम क्रूझ व अ‍ॅना डी आर्मास (फोटो- इन्स्टाग्राम)

दरम्यान, जुलैमध्ये टॉम व अॅना एकत्र फिरताना दिसले होते, तेव्हापासून ते दोघे डेटिंग करत असल्याची पुष्टी झाली. ६३ वर्षीय टॉम क्रूझने यापूर्वी तीन लग्न केली आहेत. मिमी रॉजर्स, निकोल किडमन आणि केटी होम्सशी या त्याच्या पूर्वाश्रमीच्या तीन पत्नी होय. त्याचे तिघींशीही घटस्फोट झाले. आता तो चौथ्यांदा लग्न करणार आहे, असं म्हटलं जातंय.

अमीषा पटेलला आवडतो टॉम क्रूझ

“मला टॉम क्रूझ खूप आवडतो. जर तू त्याच्याबरोबर पॉडकास्ट करशील, तर मला त्या पॉडकास्टला नक्की बोलव. मला लहानपणापासून टॉम क्रूझ खूप आवडतो. माझ्या पेन्सिल बॉक्समध्ये त्याचा फोटो होता. माझ्या फाईल्समध्ये त्याचा फोटो होता. माझ्या खोलीत फक्त टॉम क्रूझची पोस्टर्स होती. तो नेहमीच माझा क्रश राहिला आहे. मी नेहमीच गमतीत म्हणते की तो एकमेव माणूस आहे ज्याच्यासाठी मी माझी सगळी तत्वे बाजूला ठेवू शकते. मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. जर मला विचारलं की मी त्याच्यासोबत वन-नाईट स्टँड करू शकते का? तर हो, मी करू शकते,” असं अमीषा पटेल म्हणाली होती.