दोन दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘गदर २’ ऑगस्ट महिन्यात चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून अलीकडेच याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमधील सनी देओलच्या स्मशानभूमीतील सीनने सर्वांचे लक्ष वेधले होते.

हेही वाचा : “अपनेवाले घर की खिडकी…”, सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घराला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

चित्रपटात अभिनेता सनी देओल‘तारा सिंग’ची आणि अमीषा पटेल‘सकिना’ची भूमिका साकारत आहे. ‘गदर २’च्या टीझरमध्ये ‘तारा सिंग’ हे पात्र स्मशानभूमीत रडत असल्याचे दाखवण्यात आले आहे. टीझर रिलीज झाल्यापासून “तारा सिंग सकिनासाठी रडत असणार…” अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या परंतु, या सर्व चर्चांना अभिनेत्री अमीषा पटेलने पूर्णविराम देत ‘गदर २’मधील मोठा सस्पेन्स उघड केला आहे.

हेही वाचा : दीपिका पदुकोण ‘या’ गोष्टीत आहे हुशार; छुप्या टॅलेंटबद्दल खुलासा करत म्हणाली “फक्त रणवीर आणि बहिणीसमोर…”

अमीषा पटेलने सनी देओलचा (तारा सिंग) स्मशानभूमीतील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो…तुम्हाला सर्वांना टीझरमधील शेवटचा सीन पाहून सकिनाला काहीतरी झाले, ती या जगात नाही… असे वाटत आहे परंतु, असे काहीही नाही. सकिना हे पात्र जिवंत असून तिला काहीही झालेले नाही. हा सीन कोणावर आधारित आहे हे मी सांगू शकत नाही मात्र, ती व्यक्ती सकिना नक्कीच नाही…”

हेही वाचा : कार्तिक- कियाराचा ‘सत्यप्रेम प्रेम की कथा’ सिद्धार्थला मल्होत्राला आवडला की नाही? पत्नीसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमीषाने शेअर केलेली ही पोस्ट पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. एका युजरने, “तू वेडी आहेस का? हा चित्रपटातील मुख्य सस्पेन्स होता तुला काहीच कसं कळत नाही.” अशी कमेंट करत अभिनेत्रीला ट्रोल केले आहे. तर, दुसऱ्या एका युजरने “रिलीजच्या आधी चित्रपटातील सस्पेन्स सर्वांना सांगून तुला काय मिळणार आहे? आधीच तुझ्याकडे चित्रपट नाहीत त्यात असा प्रकार केलास…” अशी प्रतिक्रिया देत अमीषाची कानउघडणी केली आहे.