बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान मनोरंजसृष्टी नसली तरीही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी उघडपणे तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. मध्यंतरी एका पोस्टमधून तिने गेल्या काही वर्षांपूर्वी डिप्रेशनचा सामना केला असल्याचं सांगितलं. तर आता त्यांच्या कुटुंबात मानसिक आजार हे अनुवंशिक आहेत असा खुलासा तिने केला आहे.

आणखी वाचा : Video: लेकीच्या साखरपुड्यात आमिर खानचा ‘पापा कहते हैं’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘इ टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने डिप्रेशनबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, “नैराश्य थोडं गुंतागुंतीचं आहे. हे मुख्य करून अनुवंशिक आहे, काही प्रमाणात मानसिक आणि सामाजिक देखील आहे. माझ्या बाबतीत ते अंशतः अनुवंशिक आहे. माझ्या कुटुंबात माझ्या आई आणि वडिलांकडून मानसिक आरोग्याच्या समस्यांचा इतिहास आहे. माझे थेरपिस्ट म्हणाले की, एक ट्रिगर पॉइंट माझे पालक होते, ज्यांनी त्यांचा घटस्फोट त्या वेळी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे हाताळला.”

हेही वाचा : आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा येणार सिक्वेल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर याआधी देखील एका पोस्टमधून इराने तिने डिप्रेशनची सामना कसा केला होता हे सांगितलं होतं. इराला पाच वर्षांपूर्वी मेजर डिप्रेशन डिसऑर्डर (एमडीडी), निदान झालं होतं. ज्याला क्लिनिकल डिप्रेशन असंही म्हणतात. डिप्रेशनमध्ये असताना ती तासंतास रडायची. चार-चार दिवस ती जेवत देखील नव्हती. शिवाय सतत ती झोपायची. काही तरी चुकत आहे, असं तिला वाटत होतं. त्यावेळी ती नेदरलँड्सला होती. यावेळी, तिने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला. नंतर, तिला नैराश्यताचे निदान झालं, नंतर तिने नेदरलँड्समधून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षांच्या नियमित थेरपी आणि औषधोपचारानंतर इरा आता आनंदी आयुष्य जगत आहे.